Shivaji Kalge : काहीच दिवसांपूर्वी लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे (Dr. Shivaji Kalge ) यांच्याविरुध्द जात प्रमाणपत्रावरून दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळं काळगेंची खासदारकी धोक्यात आली होती. मात्र, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठात काळगेंनी दिलासा दिला. काळगेंविरोधात दाखल केलेल्या दोन्ही निवडणुक याचिका न्यायपूर्ती अरुण पेडणेकर (Arun Pednekar) फेटाळल्या.
बाबासाहेबांना धोका देणारे आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात; मुख्यमंत्री शिंदेंची खोचक टीका
याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे हे निवडणूक याचिकेचे मुद्दे असू शकत नाहीत, असं याचिका याचिका फेटाळताना न्यायालयाने म्हटले.
लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार नरसिंग उदगीरकर आणि नगरसेवक आल्टे यांनी कागळे यांच्याविरुध्द दोन याचिका दाखल केली होत्या. . याचिकाकर्त्यांनी प्रामुख्याने खासदार डॉ. काळगे यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता.
MG Windsor EV भारतात लॉन्च, मिळणार 331KM रेंज अन् किंमत आहे फक्त 9.9 लाख रुपये
उदगीरकर यांनी डॉ. काळगे यांच्या विरोधात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत खासदार काळगेंवर आरोप केले होते की, खा. काळगेंनी त्यांच्या गावातील प्राथमिक शाळेच्या निर्मग उताऱ्यात खाडाखोड करून स्वत:ची मूळ जात मूळ जात हिंदू-जंगम ऐवजी ‘जंगम माला’ करून घेतली. आणि निलंगा येथील विभागीया अधिकारी यांच्याकडून माला जंगम जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केलं. पुढं याच प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी लातूरमधून लोकसभा निवडणूक लढवली त्यामुळं काळगे यांचे खासदारकी रद्द करावी, अशी मागमी उदगीरकर यांनी केली होती.
कोर्ट काय म्हणालं?
काळगे यांना सक्षम अधिकाऱ्यांनी जात प्रमाणपत्र दिले होते. तसेच जात पडताळणी समितीसारख्या सक्षम प्राधिकरणाने जात वैधता प्रमाणपत्र दिले होते. याबाबी खंडपीठाने ग्राह्य धरल्या. तसेच काळगे यांना सक्षम अधिकाऱ्यांनी जातीचे प्रमाणपत्र दिले नव्हते आणि सक्षम प्राधिकारणाने वैधत प्रमाणपत्र दिले नव्हते, हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा याचिकाकर्त्यांनी निवडणूक याचिकेसोबत सादर केलेला नाही. त्यांनी याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे निवडणूक याचिकेतील मुद्दे असू शकत नाहीत, असं न्यायालयाने म्हटलं.
खंडपीठाने काळगेंविरोधात दाखल झालेल्या दोन्ही निवडणूक याचिका फेटाळत खासदार कागळेंना दिलासा.