Download App

‘पृथ्वीराज चव्हाणांची वक्तव्य अतिशय बालिशपणाची’, सुनील तटकरेंचा जोरदार प्रत्युत्तर

  • Written By: Last Updated:

Sunil Tatkare On Prithviraj Chavan : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही मराठा आरक्षण नक्कीच टिकवलं असतं, असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर (Sunil Tatkare) यांनी चव्हाण यांचा जोरदार समाचार घेतला. पृथ्वीराज चव्हाण यांची वक्तव्य अतिशय बालिशपणाची असल्याची जहरी टीका करत त्यांनी चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला.

President Droupadi Murmu Visited Shani Shingnapur : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतलं चौथऱ्यावरुन शनिदर्शन… 

आज माध्यमांशी बोलतांना तटकरेंना चव्हाण यांनी केलेल्या टीकेविषयी विचारलं असता ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य बालिश होतं. ते खोटं बोलतात, असं मी म्हणणार नाही. पण ते चुकीचं बोलत आहेत. सरकारचा पाठिंबा काढून घेतला तेव्हा निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाली होती. अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली होती. आम्ही निवडणूकपूर्व युती करण्याबाबत चर्चा करत होतो. तेव्हा मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होतो. आघाडीची चर्चा अर्धवट सोडून पृथ्वीराज चव्हाण अर्ज भरण्यासाठी कराडला गेले होते, असा दावा तटकरे यांनी केला.

Kevin Pietersen : …अन् मी पैज हरलो! भारत वर्ल्डकप जिंकण्यावर लावली होती पैज, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा खुलासा 

तटकरे म्हणाले, राष्ट्रवादीने दावा केलेल्या जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले होते. त्यामुळं आम्ही सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आणि तेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. सरकार पडलं नसतं तर आरक्षण दिलं असतं, असा दावा पृथ्वीराज चव्हाण करतात. मात्र,त्यांचा दावा चुकीचा आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. अर्ज भरले जात होते. आचारसंहिता होती. मग पृथ्वीराज चव्हाण चुकीचे का बोलत आहेत? असा सवाल तटकरे यांनी केला.

आम्ही एकत्र लढलो असतो तर सरकार आलं असते, असे चव्हाण म्हणाले. पण एकत्रित लढण्याची स्थिती कुणामुळं गेली, तर ती कॉंग्रेसमुळं गेली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा झाली होती, काँग्रेसचा दुसरा नेता मुख्यमंत्री होणार होता. राष्ट्रवादीनेही त्यास संमती दिली होती. मात्र, निर्णय काही कॉंग्रेस नेत्यांनी मान्य केला नाही. राष्ट्रवादीने संमती दिलेल्या निर्णयानुसार निवडणुका झाल्या असत्या तर राज्यात आमची सत्ता आली असती. निवडणूकपूर्व युती झाली असती. मात्र, या सगळ्याला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

चव्हाण आल्यानंतर सरकारमधील संवाद कमी झाला. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांनी आघाडीत जो समन्वय राखला होता, त्याला पृथ्वीराज चव्हाण यांनी छेद दिला, असा आरोपही तटकरेंनी केला.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
मी मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात घेतलेल्या निर्णयामुळे 2014 मध्ये राष्ट्रवादीने आमचे सरकार पाडले होते. त्यावेळी आमचे सरकार पडले नसते तर आम्ही नक्कीच मराठा आरक्षण टिकवून ठेवले असते. मला खात्री आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र निवडणुका लढवल्या असत्या तर माझे सरकार पडले नसते. आणि आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरं गेलो असतो तर 2014 मध्ये भाजपऐवजी आमचेच सरकार आलं असतं, असा चव्हाण म्हणाले होते.

Tags

follow us