Kevin Pietersen : …अन् मी पैज हरलो! भारत वर्ल्डकप जिंकण्यावर लावली होती पैज, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा खुलासा
Kevin Pietersen : इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन (Kevin Pietersen)म्हणाला की विश्वचषक 2023 (World Cup 2023)च्या फायनलमध्ये तो भारताला (Indian cricket Team)पाठिंबा देत होता आणि त्यामुळे तो पैज हरला. अहमदाबादच्या (Ahmedabad)नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium)19 नोव्हेंबर रोजी खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia)भारताचा 6 गडी राखून पराभव केला आणि सहाव्यांदा विश्वचषक जिंकला.
Sunil Tatkare : अजितदादा भेकड असते तर…?; शरद पवार गटाची टीका तटकरेंच्या जिव्हारी
पीटरसन म्हणाला की, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचा सामना केल्यामुळे भारतीय संघ खूप दडपणाखाली होता, त्यामुळे अखेर सामना गमावला. लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी आलेला पीटरसन म्हणाला, ‘दुर्दैवाने जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियाचा सामना करता, तेव्हा ते काम काही सोपं नसतं. कारण मी माझ्या कारकिर्दीत अनेकदा केले आहे.
पन्नूच्या हत्येच्या कटात भारताचा हात? अमेरिकेच्या आरोपानंतर भारताने घेतला मोठा निर्णय
केविन पीटरसननेही इंग्लंडच्या विश्वचषक 2023 च्या कामगिरीवर आपले मत व्यक्त केले आणि त्याला भयानक म्हटले. दुर्दैवाने जेव्हा तुम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळता, त्यांच्याकडे अंतिम फेरीत परिस्थिती बदलून विजेतेपद पटकावण्याची क्षमता आहे, असेही पीटरसन म्हणाला.
ऑस्ट्रेलियन संघ चुरसीनं खेळणारा आहे. त्या दिवशी भारतीय संघाचं दुर्दैव होतं. ऑस्ट्रेलियाने क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली आणि त्यानंतर फलंदाजीमध्येही स्फोटक कामगिरी केली. ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा 230-240 ही धावसंख्या त्यांच्यासाठी पुरेशी नव्हती. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियन संघासमोर तगडं आव्हान ठेवणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही. त्याच ठिकाणी मोठी गडबड झाली होती.
पीटरसनने 2023 च्या विश्वचषकातील इंग्लंडच्या कामगिरीचं भयंकर वर्णन केलं आहे. ते फायनलपर्यंत पोहोचू शकतील असं साधं कोणाला वाटलंही नाही. जेव्हा गुवाहाटी येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळला जात होता, तेव्हा मी स्पर्धेपूर्वी सांगितले होते की, विश्वचषक 2023 चा अंतिम सामना या दोन संघांमध्ये खेळला जाईल. इंग्लंडचे काय होईल याचा अंदाज कोणालाच आला नव्हता. असेही यावेळी केविन पीटरसनने म्हटले आहे.
2023 चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. भारताने प्रथम फलंदाजी केली आणि डावाच्या शेवटच्या चेंडूवर संपूर्ण संघ 240 धावांत आटोपला. भारतीय संघाला प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 43 षटकांमध्ये 4 गडी गमावून लक्ष्य गाठलं. आणि ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला.