105 आमदार असलेला नेता अर्धा उपमुख्यमंत्री; सुप्रिया सुळेंचा सणसणीत टोला

Supriya sule On Devendra Fadnvis : 105 आमदार असलेला नेता आज अर्धा उपमुख्यमंत्री झाला असल्याचा सणसणीत टोला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. एकीकडे विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता […]

'दहा वर्ष सत्तेत असूनही...', फडणवीसांनी पवारांवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळेंचा पलटवार

Supriya Sule on Devendra Fadanvis

Supriya sule On Devendra Fadnvis : 105 आमदार असलेला नेता आज अर्धा उपमुख्यमंत्री झाला असल्याचा सणसणीत टोला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. एकीकडे विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

शनाया कपूर ते ऑर्री अनेक सिने तारकांनी लावली ‘लादुरी’च्या ओपनिंग इव्हेंटला हजेरी, पाहा फोटो

सुप्रिया सुळे म्हणाल्या, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगे आगे देखो म्हणताहेत पण माझ्याकडे एक नोट आलीयं. त्यामध्ये असं लिहिलंय की भाजपमध्ये मागील अनेक वर्षांपासून भाजपात सक्रिय असलेले कार्यकर्ते पक्षात आम्हाला 33 टक्के आरक्षण देण्याची मागणी करीत आहेत. ज्या कार्यकर्त्यांनी भाजप पक्षासाठी सतरंज्या उचलल्या आहेत, लाठ्या काठ्या खाल्या आहेत. त्यांनी ही मागणी केली आहे. आज 105 आमदार असलेला नेता अर्धा उपमुख्यमंत्री असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

मराठवाड्यातील हुकूमी एक्का, मोदी लाटेतही ‘विजयी’; चव्हाणांच्या ‘पॉलिटिक्स’ची BJP लाही गरज

तसेच मागील आठवड्यात संसदेत आदर्श घोटाळा हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप भाजपचे खासदार आणि मंत्री यांनी केला होता. त्यावेळी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख व्हाईट पेपरमध्ये भाजपने केला होता. त्यानंतर लगेचच अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे ही आता भाजपची स्टाईल झाली आहे. की आरोप करायचे खरे की खोटे हे मला माहित नाही पण आरोप केल्यानंतर त्या नेत्यांच्या मागे ईडी, इनकम टॅक्स, सीबीआय लावायची त्यानंतर भाजपात प्रवेश करुन घ्यायचा आहे, भ्रष्टाचारमुक्त भारत, अशा घोषणा भाजपने केल्या आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलं आहे. ही जनतेची फसवणूक असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Exit mobile version