मुंबई : उद्धव ठाकरे लवकरच महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडतील, असं शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के (Naresh Maske) यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटामध्ये जे काही लोक बोललेले आहेत. ते आमदार लवकरात शिंदे गटांमध्ये (Shinde group) प्रवेश करतील, असाही दावा देखील त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे आज राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विधानाचा विरोध केला. काही दिवसांमध्येच ते महाविकास आघाडी तोडतील. अन् बाहेर पडतील, असे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेवरही त्यांनी टीका केलीय.
मला आजच्या सभेवरून उद्धव ठाकरे याना मोठा साक्षात्कार झाला आहे. (Maharashtra Politics) ती आज दिसून आलं आहे. कालपर्यंत आज सभेमध्ये सुद्धा जे आमदार, खासदार याना गद्दार गद्दार म्हणले जात होते, आणि त्याच व्यसपीठावरून त्यांनी आज म्हणतात की ते शिवसैनिक नव्हते. ते शिवसैनिक नव्हते तर त्यांना गद्दार का म्हणता? असा सवाल त्यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे सध्या भांबावले आहेत. सत्ता गेल्याने ते चलबिचल झाले आहेत. त्याच व्यासपीठावरती त्यांच्या बाजूला हिरे बसले होते, माणिकराव हिरे हे कोणत्या पक्षातून आले आहेत. मग ते गद्दार नाहीत का? तसेच त्यांनी संजय कदम यांचं देखील नाव घेतल, अशा व्यक्तींना तुम्ही शिवसेनेत घेता मग ते गद्दार नाही का ? नक्की काय बोलायचं आहे. मुळात शरद पवारांनी जी काय संजय राऊतांकडे स्क्रिप्ट लिहून दिली होती, त्यात नेमक्या काही चुका होत्या. त्यामुळे ते ताशा पद्धतीचा भाषण झालेला आहे. असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.