Rohit Pawar On Dilip Walse Patil : महाराष्ट्रात (Maharashtra) काही दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. सर्वांचं लक्ष राजकीय घडामोडींकडं लागलेलं आहे. त्यातच मंत्रिपदाची शपथ घेतलेले दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील एका सभेत रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला. पवार डिंभे धरणातील पाणी कर्जतमध्ये नेणार असल्याचे म्हटले, त्यावर रोहित पवार यांनी आपण त्यांच्याच मतदारसंघात जाऊन वळसे पाटील यांना व तेथील जनतेला उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये(mumbai) कॉंग्रेसने (congress) राहुल गांधी(Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. त्यात आमदार रोहित पवार देखील सहभागी झाले. त्यावेळी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.(mumbai rohit pawar criticize on dilip walse patil Ambegaon Assembly Constituency ncp)
‘जगात योग्य संदेश जाणार नाही’ G20चा संदर्भ देत केजरीवालांनी शहांना धाडली चिठ्ठी
राष्ट्रवादीमध्ये बंड करुन राज्य सरकारला पाठिंबा दिलेले आमदार शरद पवार यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच शरद पवार यांचे मानसपुत्र मानले जाणारे दिलीप वळसे पाटील यांनी रोहित पवार यांच्यामुळेच आपण राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ सोडल्याचे म्हटले आहे. रोहित पवार हे आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाचे पाणी कर्जत-जामखेड मतदारसंघात नेणार असल्याचा आरोप मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला. हा निर्णय मान्य नसल्यामुळेच आपण शरद पवार यांची साथ सोडल्याचा आरोप रोहित पवार यांच्यावर केला.
अजित पवार गटाला दिलेले आश्वासन पूर्ण होत नसल्यानं खातेवाटपाचा तिढा; रोहित पवारांचे टीकास्त्र
त्यावरुन पत्रकारांनी आमदार रोहित पवार यांना प्रश्न विचारला, त्यावर रोहित पवार म्हणाले की, वळसे पाटलांचा हा दावा हास्यास्पद आहे. तिथे असणाऱ्या लोकांनासुद्धा ते काही खरं वाटत नाही. पाण्याच्या बाबतीत मी आज या ठिकाणी काही बोलणार नाही, पण ज्यावेळी त्या मतदारसंघात जाईल त्यावेळी त्या ठिकाणच्या जनतेला आणि जुन्नरलाही त्याबाबतीतलं उत्तर देईल, असंही यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले.
त्याचवेळी रोहित पवार म्हणाले की, ते बोलत असताना माझ्या वयाचं त्यांनी काढलं. माझं एकच म्हणणं आहे की, अस्मिता, एका विचाराबरोबर राहण्याची निष्ठा या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी मला फक्त 37 वर्ष लागले. त्यांचं वय जास्त आहे. त्यांची ती खरी अडचण आहे. त्यामुळे वयाचं कुणीही काढू नये. आज निष्ठा समजून घ्यायला दहा वर्षालाही निष्ठा समजते. त्यामुळे उगाच खोटं काहीतरी सांगून, उगाच हास्यास्पद काहीतरी वक्तव्य करु नये, लोकं समजूतदार आहेत, त्यांच्या मतदारसंघातली आणि महाराष्ट्रातली सुद्धा, त्यामुळे उगीचच काहीही वक्तव्य करु नये, असंही यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले.
त्याचवेळी आमदार रोहित पवार यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला आहे. पवार म्हणाले की, टप्प्याटप्प्याने भाजप त्यांची खरी प्रवृत्ती दाखवायला सुरुवात करेल. शिंदे गटाला फोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या बाजूला केले. त्यांच्यातल्या अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांना असं वाटलं की, आता एका लोकनेत्याला आपल्या बाजूला केल्यामुळे त्यांना भाजप ताकद देईल पण भाजप त्यांना समजलीच नाही असं माझं मत आहे.
भाजपने त्यांच्याच पक्षातील लोकनेते ते कधी टिकू देत नाहीत. त्याचबरोबर बाहेरचे ज्या लोकनेत्यांना ते घेतात त्यांना ते संपवतात. हे कदाचित त्यांना समजले नाही. एकनाथ शिंदे यांची आजची परिस्थिती पाहिली तर फक्त एका वर्षात त्यांची ताकद कमी करायला लागले. त्यामुळे आता मला राष्ट्रवादीमधून तिकडे गेलेल्या नेत्यांचीच चिंता आहे, असंही रोहित पवार म्हणाले.