Download App

उद्धवजी, इतकी लोकं का सोडून चालली, आत्मपरिक्षण करा; श्रीकांत शिंदेंचा खोचक सल्ला

Shrikant Shinde criticized Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे होम ग्राउंड ठाणे शहरात काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषकांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी भाजप, मोदी सरकार आणि शिंदे गटावर जोरदार प्रहार केले. काही जणांना वाटतं आम्ही म्हणजे ठाणे, तर तसं नाही असे ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. कुणी कुठेही मेळावा घेऊ शकतो त्याच्याबद्दल मी काय बोलणार मेळाव्यामध्ये ते काय बोलले ते मला माहिती नाही आपला पक्ष वाढवायची मुभा सर्वांना आहे. मुंबईचे 22 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केलेले आहे. परवा एका मोठ्या नेत्याने प्रवेश केला मोठ्या प्रमाणात लोक आपल्याकडे येतात येणाऱ्या काळामध्ये ही संख्या आणखी वाढणार असल्याचा दावा त्यांनी केला.

INDIA आघाडीत उद्धव ठाकरेंना शक्तिप्रदर्शनाची संधी… पण शरद पवारांमुळे मिळेना मुहूर्त!

ठाकरे म्हणतात, निवडणुका घ्या निवडणुका घ्या येणाऱ्या काळात शिवसेना, भारतीय जनता पार्टी व अजितदादा गटातील सगळेच मिळून हे निवडणूक लढतील मोठ्या संख्येने महापालिकेत नगरसेवक निवडून येतील. ज्या बीएमसीमध्ये अनेक वर्षे भ्रष्टाचार केला. आता एसआयटी स्थापन झाली आहे. त्यामुळे आता सगळ्या गोष्टी बाहेर येतील. कुणी कोविडमध्ये मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाल्लं हे सगळे प्रकार समोर येतील, अस इशारा खा. शिंदे यांनी दिला.

निवडणुका व्हायच्या तेव्हा होतील मात्र, आपल्याला लोक सोडून का जात आहेत, याचा विचार कधी करणार आहात की नाही. इतकी लोकं सोडून गेली याचे आत्मपरिक्षण करा. नेमकं ते आपल्याला का सोडून जात आहेत? आपलं काही चुकतंय का हे शोधा,असा खोचक सल्लाही त्यांनी ठाकरेंना दिला.

‘2024 नंतर तुमच्यावर चारचौघात भाषण करण्याची वेळ येईल’; बावनकुळेंचा ठाकरेंवर पलटवार

नीलम गोऱ्हे, मनिषा कायंदे, मंगेश सातमकर यांच्यासारखे मातब्बर नेते सोडून जातात याचे आत्मपरिक्षण करणार की नाही, असा सवाल श्रीकांत ठाकरे यांनी केला. साडेतीन वर्षांपूर्वी आपण जे काय केलं जी काय तडजोड केली बाळासाहेबांच्या विचारांची मोडतोड केली. त्यानंतर इतके लोक आपल्याला सोडून जातात तरीही मीच कसा बरोबर आहे हे रोज समोर येऊन सांगावं लागतयं. आपलं बरोबर असतं तर इतके लोक सोडून गेले नसते आपण आधी आत्मपरिक्षण करा, असा सल्ला त्यांनी ठाकरेंना दिला.

Tags

follow us