Download App

Loksabha Election : काँग्रेसच्या 3 जागांवर राष्ट्रवादीचा डोळा : पुण्यावरुन होणार घमासान?

MVA on Loksabha Election 2024 : काही दिवसाआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत आगामी लोकसभेसाठी 16-16-16 चा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेना 18 जागांवर लोकसभा निवडणूक लढवेल, असं वारंवार सांगत आहेत. त्यामुळं आगामी काळात जागा वाटपावरून मविआ बिघाडी निर्माण होण्याची शक्यता असल्यचां बोलल्या जात आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या 3 जागांवर राष्ट्रवादी इच्छुक आहे अशी चर्चा आहे.

Accident : अमरावतीमध्ये ट्रक-बसचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू; 7 गंभीर जखमी

त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागांवरून गुंता वाढताना दिसत आहे. 2019 मध्ये आमचे 18 खासदार निवडूण आले होते. त्यामुळे आम्ही 18 जागा लढणारच असा दावा ठाकरे गटाचे संजय राऊत करत आहेत. या जागा वाटपाबाबत एकच बैठक झाली आहे. मात्र अद्याप या जागा वाटपावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. त्याअगोदरच महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागांवरून तूतू-मैंमैं सुरू झाली आहे.

‘Accident : नाशिकमध्ये कंटेनरची आयशरला धडक; मायलेकीचा करुण अंत’

यामध्ये आणखी तिढा वाढला आहे तो कॉंग्रेसच्या 3 जागांवर राष्ट्रवादी इच्छुक आहे त्यामुळे. यामध्ये 2019 ला सोलापूरची जागा कॉंग्रेसने लढली होती. मात्र आता या जागेवर राष्ट्रवादी इच्छुक आहे. तर दिवंगत भाजप खासदार गिरीश बापटांच्या निधनाने पुण्यातील लोकसभेची जागा रिक्त आहे. 2019 ही जागा कॉंग्रेसने लढली होती. तसेच वर्धा लोकसभेच्या जागेवर 2019 कॉंग्रेस लढलं होतं. मात्र आता राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी या जागेवर दावा केला आहे.

‘आता घोडामैदान जवळच आहे’; मंत्रिमंडळाच्या विस्तारावर बच्चू कडूंचे सूचक वक्तव्य

दरम्यान काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या जागांवर कॉंग्रेस देखील इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये माढा मतदारसंघात 2019 ला राष्ट्रवादीने उमेदवार दिला होता. आता मात्र या जागेवर कॉंग्रेस इच्छुक असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण याठिकाणी आपण संघटनात्मक बांधणी करणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने वर्ध्याच्या जागेवर दावा सांगितल्याने पटोलेंनी टीका देखील केली होती.

Threat Call: “मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार…”; पोलिसांना ट्विटरवर पुन्हा धमकी

त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आगामी लोकसभेसाठी 16-16-16 चा फॉर्म्युला ठरेल असं दिसत असताना आता या जागावाटपातील दावा पाहता हा गुंता दिवसेंदिवस वाढतच चालाला आहे. असं चित्र निर्माण झाला असून या पक्षांना हा फॉर्म्युलाच मान्य नसल्याचं यातून समोर येत आहे.

Tags

follow us