Accident : नाशिकमध्ये कंटेनरची आयशरला धडक; मायलेकीचा करुण अंत

Accident : नाशिकमध्ये कंटेनरची आयशरला धडक; मायलेकीचा करुण अंत

Eicher hit by container in Nashik; 2 died on the spot, 1 seriously injured : नाशिक (Nashik) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. नाशिकमधील द्वारका आडगाव (Dwarka Adgaon accident) दरम्यानच्या पुलावर एक भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सध्या जखमी चालकावर रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अपघातांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. अशातच आज पुन्हा एक मोठा अपघात झाला. नाशिकमधील द्वारका आडगाव दरम्यान हा अपघात झाला. पुलावर एक आयशर ट्रक बंद अवस्थेत उभा होता. याचवेळी एक पाठीमागून एक कंटेनर आला. या कंटेनरने पुलावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत कंटेनरमध्ये ड्रायव्हर शेजारी बसलेल्या आई आणि मुलीला जबर मार लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Accident : अमरावतीमध्ये ट्रक-बसचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू; 7 गंभीर जखमी

हा कंटेनर इगतपुरीकडून धुळ्याकडे जात अशी माहिती आहे. दरम्यान, हा अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढलं. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी ही वाहतूक सुरळीत केली असून पुढील घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube