Download App

नागपूर दंगलीचा मास्टरमाईंड फहीम खानच्या घरावर मनपाचा बुलडोझर!

Nagpur Riot Mastermind Faheem Khan : नागपूर दंगली प्रकरणात मास्टरमाईंड फहीम खानच्या घरावर नागपूर महापालिकाकडून मोठी कारवाई

  • Written By: Last Updated:

Nagpur Riot Mastermind Faheem Khan : नागपूर दंगली (Nagpur Riot) प्रकरणात मास्टरमाईंड फहीम खानच्या (Faheem Khan) घरावर नागपूर महापालिकाकडून मोठी कारवाई करण्यात आली असून त्याच्या घरावर नागपूर महापालिकाने बुलडोझरची कारवाई केली आहे. माहितीनुसार, फहीम खानच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. सध्या फहीम खानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे. यशोधरानगरमधील घरात फहीमकडून अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते.

औरंगजेबची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी नागपूर शहरात 17 मार्चरोजी विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आला होता मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळाला होता. यानंतर शहरातील काही भागात दगडफेकीची घटना घडली होती.

तर दुसरीकडे नागपूर दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर सायबर पोलिसांनी या प्रकरणी 50 पेक्षा जास्त आरोपींवर गंभीर कलमे लावली आहेत. नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 112 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेल्यांपैकी 21 जण अल्पवयीन आहे.  यशोधरानगरमधील घरात फहीमकडून अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते.

बोलताना भान राखा, कारवाई होणार, कुणाल कामरा प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम

follow us

संबंधित बातम्या