मोठी बातमी! नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा; तपासात धक्कादायक माहिती

मोठी बातमी! नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा; तपासात धक्कादायक माहिती

Nagpur Violence : नागपूर आता शांत होत आहे. दंगलीनंतर शहरात अनेक (Nagpur Violence) ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दुसरीकडे मात्र पोलिसांनी दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. नागपूर पोलिसांनी पत्रकार परिषदेत महत्वाची माहिती दिली. नागपूर दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खान आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध थेट देशद्रोहाचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर सायबर पोलिसांनी या प्रकरणी 50 पेक्षा जास्त आरोपींवर गंभीर कलमे लावली आहेत.

औरंजेबाची कबर हटविण्यावरून सोमवारी नागपूर शहरात दंगल उसळली होती. सायंकाळच्या सुमारास दोन गटांत तुफान दगडफेक झाली होती. हिंसाचाराच पाच जण जखमी झाले होते. दंगलखोरांनी ड्युटीवर असणाऱ्या महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर अश्लील शेरेबाजीही केली होती. यानंतर पोलिसांनी दंगलखोरांवर गुन्हे दाखल केले होते. तसेच या गुन्ह्यातील मास्टरमाइंड म्हणून ओळखला जाणाऱ्या फहीम खानच्या मुसक्या आवळल्या. याच फहीम खानने जमाव जमवला असा आरोप  त्याच्यावर आहे.

नागपूर हिंसाचारातील मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळल्या; गडकरींविरोधात लढवली होती निवडणूक

नागपूर शहरातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. काही व्हिडिओ आणि मेसेज परदेशी आयपी अॅड्रेसवरून व्हायरल करण्यात आल्याचे आता तपासातून पुढे आले आहे. यानंतर पोलिसांनी चौकशीसाठी काही संशयित व्यक्तींवर नजर ठेवली होती. यामागे मास्टरमाइंड म्हणून फहीम खानचे नाव समोर आले होते.

पोलिसांच्या तपासात बांग्लादेशी कनेक्शन?

दंगलीचा मूख्य सूत्रधार शोधून काढण्यासाठी सायबर पोलिसांनी या घटनेचा बारकाईने तपास सुरू केला आहे. या दंगलीचे सीसीटीव्ही फुटेज, सोशल मिडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ बारकाईने तपासून आरोपींची माहिती गोळा केली जात आहे. आरोपींचे मोबाइल आणि अन्य डिजीटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही व्हिडिओ आणि मेसेज बांग्लादेशातून व्हायरल करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर तपास सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हिंसाचारातील आरोपींनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची वर्दी खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही महिला पोलिसांना जमावातील काही लोकांनी शिवीगाळ देखील केल्याची माहिती समोर येत आहे.

फहीम खाननं लिहिली नागपूर हिंसाचाराची स्क्रिप्ट; राड्याच्या FIR मध्ये नेमकं काय काय?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube