नागपूर हिंसाचारावर संघाचं मोठं विधान! सध्याच्या काळात संयुक्तिक नसलेल्या औरंगजेबासाठी हिंसा…

नागपूर हिंसाचारावर संघाचं मोठं विधान! सध्याच्या काळात संयुक्तिक नसलेल्या औरंगजेबासाठी हिंसा…

RSS says Nagpur violence is inappropriate for Aurangzeb, who not composite in present : औरंगजेबाच्या कबरी विरोधात 17 मार्च रोजी नागपुरात बजरंग दल (Bajrang Dal) आणि विश्व हिंदू परिषदेकडून (VHP) आंदोलन करण्यात आले होते मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दोन गटात तुफान राडा झाला आणि या राड्यात पोलिसांवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रतिक्रिया आली आहे. त्यामध्ये संघाचे प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी एका कार्यक्रमात त्यांना नागपूर हिंसाचारावर प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले आहे.

व्हायचं होतं जनावरांचं डॉक्टर पण, नशिबी होती अंतराळाची सफर; सुनीता विलियम्सचं करिअरच घडलं

यावेळी बोलताना सुनील आंबेकर म्हणाले की, औरंगजेबाचा मुद्दा आजच्या काळामध्ये संयुक्तिक नाही. त्यामुळे त्यावरून आजच्या काळात हिंसा करणे देखील अयोग्य आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या हिंसेला प्रोत्साहन देणे देखील चुकीचे आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. आंबेकर यांना विचारण्यात आले होते की, औरंगजेबाचा मुद्दा आजच्या काळामध्ये संयुक्तिक आहे का? तसेच औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी का? त्यावनर उत्तर देताना आंबेकर यांनी हे विधान केलं आहे.


दरम्यान ज्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने हे आंदोलन सुरू केलं होतं. त्याच विचाराच्या असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र अगदी वेगळी प्रतिक्रीया दिल्याने यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. ज्यामध्ये कॉंग्रेसकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेचं स्वागत करण्यात आलं आहे. कॉंग्रेस नेते अतुल लोंढे म्हणाले की, देशासमोर सामाजिक, अर्थिक आव्हानं असताना अशा प्रकारे हिंसाचार योग्य नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतलेली भूमिका योग्य आहे.

नेमकं काय घडलं?

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशपेठ आणि महाल परिसरात 17 मार्च रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर औरंगजेबाची कबर हटवण्याच्या अनुषंगाने आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी औरंगजेबाचा फोटो आणि औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरेवरील हिरव्या रंगाची चादर जाळली आणि याचे काही फोटो सोशल मीडिायावर व्हायरल करण्यात आले. तर रात्री सात वाजता विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारेबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांना आंदोलन बंद करण्यास भाग पाडले.

Hinjawadi Accident : जीव वाचवण्यासाठी धडपड अन् एकावर एक चौघांच्या बॉडी; भयावह अपघातातील मृतांची ओळख पटली

तर चिटणीस पार्क चौकाकडून रात्री आठच्या सुमारास एक गट आला आणि या गटाकडून हिरव्या चादरीबाबत आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेत परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात केला. तर साडेआठच्या सुमारास दोन्ही गटांकडून नारेबाजी करण्यात आली आणि त्यामुळे वाद चिघळला. यानंतर पोलिसांनी परिसरातील दुकाने बंद करण्यास भाग पाडले. काने बंद केल्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि त्यानंतर दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यास सुरुवात झाली. रात्री 8.40 पासून वाजतापासून दंगल उसळली आणि पोलिसांनी रात्री नऊपासून कोम्बींग ऑपरेशनला सुरूवात केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube