Download App

जरागेंचा इशारा म्हणजे फडणवीसांचं पाप, राहुल गांधी PM झाले असते तर…; पटोलेंचा हल्लाबोल

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. जरांगेंचा इशारा हे फडणवीसांचं पाप आहे, असा टोला त्यांनी लगावला.

  • Written By: Last Updated:

Nana Patole On Devendra Fadanvis : लोकसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) चांगलेच आक्रमक झालेत. सरकारने मराठा आरक्षण दिलं नाही तर आम्ही विधानसभा निवडणूक लढवू, असा इशारा जरांगेंनी दिला. याच इशाऱ्यावरून आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. जरांगेंचा इशारा हे फडणवीसांचं पाप आहे, असा टोला त्यांनी लगावला.

जिथे मंदिर बांधलं, तिथे रामाने मोदींना लाथाडलं; राऊतांची मोदींवर घणाघाती टीका 

नाना पटोलेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना पटोले म्हणाले, जरांगेंनी दिलेला इशारा म्हणजे फडणवीसांचे पाप आहे. मोदी आणि फडणवीस सरकार 2029 पर्यंत जातनिहाय जनगणना करणार नाही. त्यामुळे ते आरक्षण देऊ शकणार नाही. राज्यात आणि देशात तेढ निर्माण करण्याचा मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे. नरेंद्र मोदी चुकून पुन्हा पंतप्रधान झाले. राहुल गांधी पंतप्रधान झाले असते तर आरक्षणाचा तिढा सुटला असता, असं पटोले म्हणाले.

हाकेंनी संयम ठेवलाय त्यांना गांभीर्याने घ्या; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहित पंकजा मुंडे मैदानात 

पुढं बोलतांना पटोले म्हणाले की, राज्यातील सरकार हे बोलक्यांचे सरकार आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली. फक्त मुठभर लोकांच्या आणि गुजरातच्या इशाऱ्यावर चाललेलं हे सरकार आहे, अशी टीकाही त्यानी केली.

पटोले यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांकून पाय धुवून घेतल्याचा निषेध म्हणून भाजपकडून आज चिखलेफेक आंदोलन करण्यात आलं. याविषयी विचारलं असता पटोले म्हणाले की, भाजपने आज ज्या पद्धतीने आंदोलन केली, त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस शुक्रवारी राज्यभरात तालुक्या-तालुक्यांत भाजप कार्यालयांसमोर आणि नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर चिखलफेक आंदोलन करणार असल्याचेही पटोले म्हणाले.

जरांगेंचा इशारा काय?
विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास आमचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करू. आम्ही 127 मराठा बहुल विधानसभा मतदारसंघांची चाचपणी पूर्ण केली. आता स्वत:चा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की, अपक्ष म्हणून उभे करायचे हेच ठरवायचं आहे, असा इशारा जरागेंनी दिला होता.

follow us