जिथे मंदिर बांधलं, तिथे रामाने मोदींना लाथाडलं; राऊतांची मोदींवर घणाघाती टीका

जिथे मंदिर बांधलं, तिथे रामाने मोदींना लाथाडलं; राऊतांची मोदींवर घणाघाती टीका

Sanjay Raut On PM Narendra Modi : षण्मुखानंद सभागृहातीतल ठाकरे गटाच्या वर्धापन सोहळ्यात बोलतांना खासदार संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) तडाखेदार भाषण केलं. यावेळी बोलतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींव (Narendra Modi) जोरदारी टीका केली. गुजरातच्या सोमे-गोमे चारशे पार करायला आले होते, पण जिथं मंदिर बाधंल तिथे रामाने मोदींना लाथाडलं, अशी टीका राऊतांनी केली.

शिवसेना फोडणाऱ्या नालायकांसोबत जाणार नाही, ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज 58 वा वर्धापन दिन मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात साजरा होतोय. या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांच्यासह, भास्कर जाधव, नवनिर्वाचित खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेला संबोधित करताना राऊत म्हणाले, उत्तर प्रदेशातल्या अयोध्येत राम मंदिर उभारलं. त्यात फक्त रामाचा फोटो एवढासा. त्या मंदिरातही मोदीच दिसत होते. आता रामाने लाथ घातल्यावर मोदींना राम दिसला असेल. मोदींच्या हिंदुत्वाचा देशाने पराभव केला. कारण त्यांचं नकली आणि ढोंगी हिदुत्व आहे, जे महाराष्ट्राने आणि देशाने नाकारलं, अशी टीका राऊतांनी केली. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. वाराणसीमध्ये ते पाच फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते. जिथे जिथे हिंदुत्व, मंदिरं, तिथं पराभव झाला, असंही राऊत म्हणाले.

… तर चित्र वेगळे असते, मोदी आणि शाहंकडे मी येतो; उमेदवार बदलल्याने रामदास कदम संतापले 

डोमकावळ्यांचं संमेलन…
यावेळी बोलतांना त्यांनी शिंदे गटावरही टीका केली. ते म्हणाले, आज डोम सभागृहात डोमकावळ्यांचं संमेलन सुरू आहे. आपला उद्या हिरक महोत्सव सुरू होईल. त्यांनी कशीबशी अडीच वर्ष पूर्ण केली. त्यांना सत्ता लागला आहे. पण, पुढे त्यांना हे यश मिळणार नाही. यांचा कसला स्ट्राइक रेट ? तुमच्या गद्दारीचा आणि बेईमानाीचा स्ट्राईक रेट वाढला आहे, अशी टीका करत या सात जणांमध्ये अमोल कीर्तिकरांची जागाही आपलीच आहे, असंही राऊत म्हणाले.

मोदी ब्रॅंड नाही, मोदी ब्रँडी झाली
छत्रपतींनी दिल्लीपुढे जशी मान झुकवली नाही. त्याच महाराजांचा वारसा उद्धव ठाकरेंनी पुढे नेला. मला आश्चर्य वाटतं, आता भाजप धन्यवाद यात्रा काढतेय. अरे तुमचा पराभव झाला. मला वाटतं, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. मोदी ब्रँड होते, आता मोदी ब्रँडी झाली. त्यामुळं भाजपवाले नशेत आहेत. आता ब्रँडीचे दोन दोन घोट हे मारत आहेत, अशी टीका राऊतांनी केली.

मोदी-शहा शिवसेनेला संपवायला निघाले होते. पण, ज्याप्रमाणे भगवान शंकरांनी हलाहल पचवलं होतं, तशाच प्रकारे शिवसेना उभी राहिली आहे. बाळासाहेब ठाकरेंना वेळ जात नव्हता म्हणऊन त्यांनी शिवसेना स्थापन केली नाही. ही शिवसेना संघर्ष आणि विचारांमधून उभी केली आहे. गुजरातच्या सोम्या गोम्यांनी कितीही वार केले तरी शिवसेना संपणार नाही, असंही राऊत म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube