विधानसभेला 100 जागा घ्या नाहीतर, चर्चेसाठी मला मोदी-शाहंकडे न्या : रामदास कदम
Ramdas Kadam Criticize BJP Demand 100 Seats In Vidhansabha : आगामी विधानसभा ( Vidhansabha) निवडणुकीमध्ये मोदी आणि शाह यांना सांगा की, आम्हाला शंभर उमेदवार द्या आम्ही 90 निवडून आणतो. नाही तर मला त्यांच्याकडे चर्चेसाठी न्या. मी त्यांना तसं सांगतो. असं म्हणत रामदास (Ramdas Kadam ) कदम यांनी आगामी विधानसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेसाठी 100 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे आता विधानसभेत महायुतीत जागावाटपामध्ये शिवसनेची मागणी पूर्ण होणार का? भाजप अन् अजित पवार यांना किती जागा मिळणार? या सर्व चर्चांना उधाण आले आहे.
“माझं मोदींशी भांडण नाही पण..” शरद पवारांनी नेमकं काय सांगितलं?
त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे उमेदवार दोन महिने अगोदर घोषित केले असते तर आज चित्र वेगळे दिसलं असतं. तसेच शिवसेनेचा (Shivsena ) उमेदवार जाहीर केला की भाजपचे मंडळी आमची जागा आमची जागा म्हणत होते. असं म्हणत शिवसेना नेते रामदास कदम यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बदलायला लावल्याने भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. ते काल19 जूनला मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
Mumbai | On the party’s foundation day, Shiv Sena (Shinde faction) leader Ramdas Kadam says, “I request CM Eknath Shinde that he tell BJP that we want 100 seats in Assembly elections and that we will surely win on 90 seats.” pic.twitter.com/0fteQ0bYoV
— ANI (@ANI) June 19, 2024
उद्धव ठाकरेंनी मोदींचा खुळखुळा केला, मोदी ब्रॅंड नाही, ब्रॅंडी झालेत…; राऊतांचे टीकास्त्र
यावेळी बोलताना कदम म्हणाले की, उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कुठेही गाफिल राहता कामा नये. मात्र एकनाथ शिंदे यांना हात जोडून विनंती आहे की, भाजपच्या नेत्यांना सांगा की, जसे भाजपचे उमेदवार दोन महिने अगोदर दिले तसे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार दोन महिने अगोदर घोषित केले असते तर आज चित्र वेगळे दिसलं असतं. हे मोदी आणि शाह यांना देखील सांगा अन्यथा त्यांच्याकडे हे सांगण्यासाठी मला घेऊन चला.
केंद्रीय मंत्र्यांना साधं ‘बेटी पढाओ’ही लिहिता आलं नाही; ‘त्या’ व्हिडिओवरुन काँग्रेस-भाजपात जुंपली
कारण त्यामुळेच भावना गवळी हेमंत गोडसे हे दिल्लीत जाऊ शकले नाही. कारण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा उमेदवार जाहीर केला की भाजपचे मंडळी आमची जागा आमची जागा म्हणत होते. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मोदी आणि शाह यांना सांगा की आम्हाला शंभर उमेदवार द्या आम्ही 90 निवडून आणतो. असं म्हणत रामदास कदम यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बदलायला लावल्याने भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला महायुतीमध्यें 100 जागा दिल्या जाव्यात अशी मागणी केली आहे.