Nana Patole : आषाढी वारीनिमित्त (Ashadhi wari) संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यादरम्यान या सोहळ्याला काल गालबोट लागलं. काल आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले. विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. वारी बंद पाडण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप पटोलेंनी केला. (Nana Patole Criticise on eknath shinde and devednra fadanvis from above Wrkari and Cabinet expantion)
कर्नाटकच्या विजयाने काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेसने पुन्हा एकदा जोमाने तयारीला लागली आहे. आज कॉंग्रेसची मुंबईत बैठक झाली. त्यानंतर कॉंग्रेसने पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पटोले म्हणाले, महाराष्ट्रात सरकार शाहु-फुले-आंबेडकर विचारधारेला संपवत आहे. मनुवादी विचारांचा प्रचार करण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडून चालू आहे. मात्र या या मनुवादी विचारांना संपवणं हे कॉंग्रेसचं धोरण आहे.
पटोले म्हणाले, तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी सातत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीाबाई फुले यांचा वारंवार अवमान केला. काल वारकऱ्यांवर लाठीचार्च केला. वारी ही महाराष्ट्राची पंरपरा आहे. अंधश्रद्धा निर्मुलनाचं कामं, व्यसनमुक्ती समाज निर्माण करण्याचं काम वारकरी संतांनी केलं. या संतांनी मनुस्मृतींचा संतांनी निषेध केला. त्यामुळं या वारकरी पंरपरेला संपण्याचं पाप सरकार करत आहे, अशी टीका पटोले यांनी केलं.
मोदींकडून बळीराजाच्या डोळ्यात धुळफेक, राज्य मुल्य आयोगाने शिफारस केलेल्या हमीभावाला केराची टोपली
राज्यचात शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, कष्टकरी यांचे प्रश्नांवर सरकार बोलत नाही. मात्र, कॉंग्रेस याविरोधात आवाज उठवेल. याविरोधात एक मोठी जनजागृती कॉंग्रेस करील, असं आजच्या मिटींगमध्ये ठरल्याचं पटोले यांनी सांगितलं. हे सरकार सलाईनचं सरकार आहे. हे सरकार कधी पडेल, याची गॅरंटी नाही. त्यामुळं आता मंत्रालयात फायली क्लिअर करण्याचं काम चालू आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करायला सरकार तयार नाही. कर्नाटक सरकार कॉंग्रेसचं सरकार येऊन फार थोडे दिवस झाले, पण तिथं मंत्रिमंडळ विस्तार झाला. महाराष्ट्रात गेल्या एका वर्षापासून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, सर्वसामान्यांविषयी आस्था सरकारमध्ये नाही, असं पटोले म्हणाले.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाविषयी विचारले असता, पटोलेंनी सांगितलं. आमच्यात जागा वाटपावरून कुठलाही वाद नाही. वाद तिकडे भाजप-शिवसेनेत चालू झालेत. आम्ही मेरीटच्या आधारावर जागा वाटप करणार आहोत. आमच्यासाठी जागेवरून आपापसात लढणं महत्वाचं नसून आम्ही जागा जिंकणं याला प्राधान्य दिल्याचं पटोलेंनी सांगितलं.
यावेळी पटोलेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, शिंदे गट आणि भाजपात वाद आहे. एकनाथ शिंदेनी फडणवीसांचा वाट लावली. दोस्त दोस्त ना रहा, अशी देवेंद्र फडणवीसांची परिस्थिती आहे. फडणवीस सध्या कुठं दिसत नाहीत. त्यांना एकनाथ शिंदेनी गायबच केलं. आमच्या मित्राने आता जपून राहावं. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी परिस्थिती आता राहिली नाही. आता दाढीवाले आले, फडणवीसांची जी गत शिंदेनी केली, त्याचं वाईट वाटतंय, असा खोचक टोलाही त्यांनी लगावा.
स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या संदर्भात प्रश्न विचारताच, पटोले म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार घेत नाही. कारण, सरकारला हरण्याची भीती वाटते. स्थानिक पातळीवर सरकारविषयी सामान्यांमध्ये रोष आहे. आज एकनाथ शिंदेची वृत्तपत्रांत जाहिरात आली, त्यात जनतेने कौल दिला असं सांगितलं. मात्र, एकदा निवडणुका घ्या, मग जनतेचा कुणाला कौल आहे, हे कळेल, असं आव्हानंही पटोले यांनी दिलं.