Nana Patole : कोण हिंदू आहेत याचा काय शिंदे-फडणवीसांनी ठेका घेतला आहे का? हिंदूंचा ठेका काय फक्त त्यांच्याकडे आहे का, छत्रपतींची हिंदवी स्वराज्याची एक भूमिका होती, त्यावरच आम्ही चालत आहोत. कोणाच्या एैऱ्या-गैऱ्याच्या सांगणाऱ्यावर आम्ही चालत नाही. आम्ही देखील कांग्रेसच्यावतीनं अयोध्यात जाणार आहोत. अयोध्यात जाणं म्हणजे काय पाकिस्तानात जाण्यासारखं नाही आहे. रामराज्याचा अर्थ सर्व आनंदी मात्र इथे तर सर्व जण दु:खी आहेत, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
ठाणे येथे काँग्रेस कार्यकारीणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. नाना पटोले म्हणाले की, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न ज्यात आऊटसोर्सिंगनं भरल्या जाणार आहेत. महाराष्ट्रात २०१४-१९ मध्ये सतत सांगण्यात येत होतं की जंम्बो मेगाभरती केली जाणार आहे. मात्र, एकही जागा भरली गेलेली नाही. जनतेची मोठी गैरसोय झाली आहे.
नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल! २१ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या… – Letsupp
कोरोनाच्या काळानंतर आता सरकार आऊटसोर्सिंगच्या मदतीनं होणार आहे. लोकांची कामं होणार नाही, गोपनियतीची पत्र नाना पटोले म्हणाले की, बाहेर जाण्याचा धोका आहे. आत्ताचे सरकार देखील आऊटसोर्सिंग, हे केंद्राचे हस्तक आहे. जी-२० च्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी आणि लूट होत आहे. महागाई वाढत चालली आहे. औषधांच्या किंमती वाढवल्या गेल्या आहेत. पैसा नाही म्हणून लोकं इलाज करु शकत नाही आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस वेगळा पक्ष आहे, त्यांचा नेता वेगळा आहे. आमची भूमिका वेगळी आहे. कोणी काय बोलावे हा त्यांचा प्रश्न, आमची भूमिका स्पष्ट आहे.जेपीसीमध्ये सत्ताधाऱ्यांची संख्या जास्त असेल पण खरी गोष्ट समोर येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर का बोलत नाहीत ? कोणाच्या घरात काय सुरू आहे हे बघण्याची आमची सवय नाही. एपीएमसी एकत्र लढण्याचे ठरवले आहे. भाजपा बरोबर एनसीपी का गेली हे मविआमध्ये चर्चा करण्यात येईल. राहुल गांधी यांच्या सर्व राज्यात सभा होतील. पहिली सभा नागपूरमध्ये होणार असून अजून तारीख नक्की झालेली नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले.