नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल! २१ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या…
Nana Patole : राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण ५ पटीने वाढले आहे. बी-बियाण्याचे भाव अमाप प्रमाणात वाढवले आहेत. महाराष्ट्रात २१ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, यात फक्त ९ हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवलं आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम सरकारनं केल आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, आतंकवादी, खलिस्तानी म्हणतात, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. तसेच यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे आम्ही शेतकऱ्यांना आवाहन करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.
ठाणे येथे काँग्रेस कार्यकारीणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. नाना पटोले म्हणाले की, शेतकऱ्यांचा माल खरेदी केला जात नाही. ज्वारी कापसाचे भाव पडत आहेत. शेतकऱ्यांना न्याय द्यायची भावना आमची आहे.
अडाणी आणि मोदींचा संबंध काय? आम्ही विचारत राहणार… – Letsupp
ओबीसीचा जातिनिहाय जनगणनेचा ठराव आम्ही पारीत केला आहे. केंद्रात कॉंग्रेस सरकार आल्यानंतर ओबीसीचं मंत्रालय बनवण्याचा विचार आहे. महाराष्ट्रात जातीयवाद निर्माण करण्याचं काम होत आहे. राज्यातल्या जनतेनं यात पडू नये, लोकांनी संयमाने राहावं, यांच्या भानगडीत पडू नये. मराठवाडा मुक्तीसंग्राम यांच्यावतीनं मविआच्या वतीने एक कमिटी तयार करण्यात आली होती, असे नाना पटोले यांनी सांगितले.
नाना पटोले म्हणाले की, मराठवाड्याच्या शौर्याची भूमिका मांडायची नाही अशी भूमिका या सरकारची आहे. मात्र, सरकार यावर ब्र देखील काढायला तयार नाही. मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील मुक्तीसंग्रामाचा इतिहास पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी गावागावात काँग्रेस कार्यकर्ते काम करणार आहे.