अडाणी आणि मोदींचा संबंध काय? आम्ही विचारत राहणार…

अडाणी आणि मोदींचा संबंध काय? आम्ही विचारत राहणार…

Nana Patole : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जे प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरं केंद्र सरकारने दिली पाहिजे. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी प्रयत्न केला आहे. कर्नाटकातलं प्रकरण सुरतमध्ये चालवायचे. जनतेचा आवाज म्हणून राहुल गांधी बोलत होते. केंद्र सरकारने कितीही आवाज दाबायचा प्रयत्न केला तरी आम्ही गौतम अडाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध काय आहे, हे आम्ही विचारत राहणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.

ठाणे येथे काँग्रेस कार्यकारीणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते. नाना पटोले म्हणाले की, कायदा सुव्यवस्थेला ठिक करण्यासाठी, भय दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु आणि सरकारला वठणीवर आणू. आजच्या बैठकीत चार-पाच ठराव आम्ही केले आहेत.

Narayan Rane भडकले, म्हणाले… ‘कोण शिक्षणमंत्री?’ – Letsupp

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा झाले आहेत. गिरीश कोळी यांना धमकी दिली गेली. मात्र, तक्रार घेतली जात नाही. जिविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातले मुख्यमंत्री ठाण्यातले आहेत. मात्र, ठाण्यातच कायदा सुव्यवस्था नसल्याची जाणीव होते. तर राज्यात गारपीट, आवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम राज्य सरकारने केले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राहुस गांधी यांनी अडाणी यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपये कोणाचे आले आहेत, असा प्रश्न विचारल्यानेच त्यांची केस पुन्हा ओपन केले. त्यांनंतर त्यांना शिक्षा सुनावत तातडीने खासदारकी रद्द केली. हे सर्व सुडाच्या भावनेने केले आहे. मात्र, असे केल्याने आम्ही गप्प बसणार नाही. तर आम्ही अडाणी आणि पंतप्रधान मोदी यांचे संबंध काय, असे प्रश्न विचारत राहणार असल्याचे नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube