Download App

मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार…, भाजपने पवार कुटुंबात भांडणे लावली; पटोलेंची जहरी टीका

  • Written By: Last Updated:

Nana Patole On BJP : भाजपने (BJP) पवार कुटुंबात भांडणे लावलीत. आम्हाला असं वाटतं की, पवार कुटुंबाने एकत्रित राहावं, असा आमचा विचार आहे. त्यांना काय वाटते तो त्यांचा प्रश्न आहे. भाजप अशी घरं फोडून महाराष्ट्रातील संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) केली आहे.

Deepak Kesarkar : शरद पवारांकडून शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न, शिंदे गटाचा गंभीर आरोप

मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. सर्व पक्षांच्या भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये सामील करून घेणारे मोदी हे भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत. भाजपला सत्तेचा माज आला आणि मस्ती आली, असं पटोले म्हणाले.

Deepak Kesarkar : शरद पवारांकडून शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न, शिंदे गटाचा गंभीर आरोप 

पटोले म्हणाले, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी समाजातील सर्व घटकांच्या समस्या, वेदना, दु:ख जाणून घेतले. त्यांना जनतेचा मोठा पाठिंबाही मिळाला आहे. नरेंद्र मोदी हे फेल इंजिन असून राहुल गांधींचे इंजिन देशाला पुढे घेऊन जाईल, असा विश्वासही पटोले यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवावा. पालकमंत्र्यांनी राजकारण करण्यापेक्षा आपलं काम केलं पाहिजे, असा सल्लाही पटोलेंनी दिला.

अजित पवार वॉशिंग मशिनमधून बाहेर आले
यावेळी त्यांनी अजित पवारांवरही टीका केली. अजित पवार हे आता वॉशिंग मशिनमधून बाहेर आलेले आहेत. त्यामुळे डोक्यातलं त्यांचं सेटअप अजून सुधारलेले नाही. त्यांना अमित शहा आणि मोदींना खूश करायचे आहे. राहुल गांधींवर टीका करून मोदी खुश होतील, असे अजित पवारांना वाटत असेल, तर त्यांनी हे डोक्यातून काढलं पाहिजे, असा इशारा पटोलेंनी दिला.

follow us

वेब स्टोरीज