ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते, त्यांच्या पदरात…; CM शिंदेंची पवारांवर टीका

ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते, त्यांच्या पदरात…; CM शिंदेंची पवारांवर टीका

Eknath Shinde On Sharad Pawar : अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्याला प्रत्युत्तर देतांना शरद पवारांनी (Sharad Pawar) मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार, असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून शरद पवारांवर महायुतीकडून (Mahayuti) सातत्याने टीका केली जात आहे. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पवारांवर टीका केली.

Ahmednagar LokSabha : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार ? लंकेंची गुगली 

घरातले पवार आणि बाहेरच पवार वेगळे, असं वक्तव्य केल्यानंतर शरद पवारांवर अजित पवार गटाने टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर पवारांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काल अजित पवार शरद पवारांना लक्ष केलं. तर आज मुख्यमंत्री शिंदेंनी पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते, त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या. ज्यांच्या मनात मांडे असतात, त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्यांनी केली.

आज बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी आयोजित सभेला संबोधित करतांना ते बोलत होते.

Ahmednagar LokSabha : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार ? लंकेंची गुगली 

पुढं बोलतांना शिंदे म्हणाले, सुनेत्रा पवार आणि अजित पवार बारामतीचा कायापालट केल्याशिवाय शांत बसणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे, त्यासाठी सुनेत्रा पवारांना निवडून द्यावे लागले. त्यांचा फॉर्म भरायला एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिलेत, ही अजित पवार यांच्या कामाची पोचपावती आहे. बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे मते

नेमकं काय म्हणाले होते शरद पवार?
बारामतीच्या प्रचार सभेत अजित पवार म्हणाले की, आजपर्यंत पवार साहेबांना मत दिल. मला आणि सुप्रिया सुळेंना मतदान केलं. आता सूनेला मतदान करायचं, ज्या ठिकाणी पवार हे नाव दिसेल, त्या ठिकाणी मतदान करा, असं ते म्हणाले होते. त्यावर बोलतांना शरद पवार म्हणाले, पवारांनाच मतदान करा हे अजित पवारांचे मत योग्य आहे, पण मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार हे वेगवेगळे आहेत, असे शरद पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज