Pune By-Poll Results 2023 : नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका, ‘पैशाचा वापर झालेला हा पहिला निकाल’

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) निवडणूक निकालात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. (Pune Bypoll Election Results 2023) सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आघाडी घेतली. त्याची आघाडी कायम आहे. यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी कसबा पेठ निवडणुकीच्या निकालावर भाजपवर सडकून […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 02T130200.030

Pune By-Poll Results 2023

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) निवडणूक निकालात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. (Pune Bypoll Election Results 2023) सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आघाडी घेतली. त्याची आघाडी कायम आहे. यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी कसबा पेठ निवडणुकीच्या निकालावर भाजपवर सडकून टीका केली.

कसबा हा मतदार संघ कोणाचा आहे ते आता ते भाजप सांगू शकत नाहीत. ते गृहीत धरुन चालले होते. नेहमी सांगायचे आमचा सातबारा तिथे आहे. पण आता चित्र वेगळं आहे. तर जनतेनी चांगले उत्तर द्यायला सुरुवात केली. पैशाचा वापर झालेला हा पहिला निकाल आहे. पैसे वाटून लोकांना आम्ही विकत घेऊ शकतो, असं दाखवलं. पण लोकांनी त्यांना दाखवून दिलं आहे, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना भाजपच्या बालेकिल्ल्यात अर्थात पेठेतील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या पेठेतील अनेक परिसरातून धंगेकर आघाडीवर आहेत. कसबा, शनिवार, सदाशिव, नवी पेठ काही भाग, अल्पना टॉकीज, बुधवार पेठ, रविवार पेठ, गणेश पेठ, डोके तालीम, बोहरी आळी, रामेश्वर चौक, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता या ठिकाणाहून धंगेकर यांनी आघाडी घेतली होती.

त्यामुळे या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार रोडशो केला होता. तसेच प्रचारही केला होता. मात्र, लोकांनी त्यांना नाकारले आहे, अशी प्रतिक्रिया आता कसबा पेठेत ऐकायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया दिली. अंधारे म्हणाल्या, की ‘कसबा मतदारसंघात धंगेकरांचा विजय म्हणजे जनशक्तीने धनशक्तीवर मिळवलेला हा विजय आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने जनमताचा कौल वाढत चालला आहे.

Live Blog : चिंचवडमध्ये अश्विनी जगताप विजयी

या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीला आणखी बळ मिळाले आहे. भारतीय जनता पार्टीबरोबर (BJP) जो पर्यंत खरी शिवसेना (Shivsena) होती. त्यांच्याबरोबर जोपर्यंत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे नाव होते. तोपर्यंतच त्यांना कसब्यात (kasba Bypoll Result) विजयाची खात्री होती. ज्या क्षणी त्यांनी शिवसेनेबरोबर बेईमानी केली त्याक्षणी ही खरी शिवसेना महाविकास आघाडीच्या बाजूने उभी राहिली आणि आज त्याची परिणिती धंगेकरांचा विजय आहे.

 

Exit mobile version