live now
Live Blog : चिंचवडमध्ये अश्विनी जगताप विजयी
Pune Bypoll Results : राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. कसब्यात काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. रवींद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी निवडून आले आहेत.
दरम्यान चिंचवडमध्ये अश्विनी जगताप या अजूनही आघाडीवर आहेत. शेवटच्या काही फेऱ्या मोजण्याचे शिल्लक आहे. पुढील काही वेळात तेथील निकाल स्पष्ट होईल.
LIVE NEWS & UPDATES
-
‘चिंचवडही जिंकलं असतं पण…’ ‘राहुल कलाटेंवर अजित पवार म्हणाले
महाविकास आघाडीने ही जागा जिंकून राज्याला एक वेगळा मेसेज दिला आहे. असंच चिंचवडलाही घडली असती पण तिथे राहुल लकाटे यांच्यामुळे तेथे मतविभागणी झाली. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला त्याचा फायदा झाला. त्यांना भाजप शिंदेंनीही सहकार्य केलं. पण त्यामुळे आमचा पराभव झाला असं नाही दोन्ही जागा भाजपच्या आणि सहानुभूती होती. पण या ऐवजी महागाई, बेरोजगारी आणि शिवसेनेचं चिन्ह काढून घेतल्याचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली ते कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीच्या विजयानंतर बोलत होते.
Kasba By Election : ‘चिंचवडही जिंकलं असतं पण…’ ‘राहुल कलाटेंवर अजित पवार म्हणाले
-
रासने पडले… पण १६ नगरसेवकांचे तिकीट अडले!
पुणे : कसबा पेठ मतदार संघात (Kasba Bypoll) भाजपचे १६ नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच या मतदार संघाकडेच सलग चार वर्षे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष होते. या पोटनिवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या हेमंत रासने यांना निवडून आणण्यासाठी या १६ नगरसेवकांना काम करण्याचे आदेश दिले होते. तसेच जर हेमंत रासने निवडून आले नाही तर येणाऱ्या महापालिकेत तुम्हाला नगरसेवकाचे तिकीट मिळणार नाही, असा एकप्रकारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दमच दिला होता.
-
Ravindra Dhangelkar : धंगेकरांनी उधळला गुलाल, कार्यकर्ते म्हणतात...
-
चिंचवडच्या अखेरच्या सात फेऱ्यांमध्ये उलटफेर होणार का? धाकधूक वाढली
LIVE : चिंचवडच्या अखेरच्या सात फेऱ्यांमध्ये उलटफेर होणार का? धाकधूक वाढली.
लेट्सअपचे प्रतिनिधी विष्णू सानप यांनी घेतलेला आढावा
-
फडणवीस आणि शिंदेंना जनतेने सपशेल नाकारले - जयंत पाटील
ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकार पाडण्याच काम झालं, शिंदे-फडणवीस सरकारने ज्या काही राजकीय संस्कृतीला बाधक ठरणाऱ्या गोष्टी केल्या. त्याचा विरोध जनतेने केला. मतदारांनी रासने यांना धोबीपछाड करून धंगेकरांना मतदारांनी विजयाचा कौल दिला, यावरुन मतदार शिंदे-फडणवीस यांच्या कसब्यातील कामाविषयी नाराज असल्याचं दिसतं असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.
‘फडणवीस आणि शिंदेंना जनतेने सपशेल नाकारले’; कसब्यातील विजयानंतर जयंत पाटलांचा हल्लाबोल
-
`Pune BJP म्हणजे मोहोळ, मुळीक, बीडकर आणि रासने हे काही योग्य नाही`
कसब्यात केवळ भाजपाचे हेमंत रासने यांचा पराभव झालेला नाही तर कोल्हापुरात ज्यांना फारसे काही जमले नाही आणि राज्यात सत्ता उपभोगूनही ज्यांना आपल्या जिल्ह्यात स्वतःचा मतदारसंघ तयार करता आला नाही, त्या पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा मोठा पराभव आहे. खरंतर त्यांनी हा पराभव झाल्यावर पुण्याचे पालकमंत्रीपद सोडून द्यायला हवे. पण ते तसे करणार नाहीत.
भाजपच्या या पराभवाचे विश्लेषण करणारा लेख मुक्त पत्रकार विश्वनाथ गरुड यांचा लेख
Election Results 2023 Live : नागालॅंड भाजपपुढे पण मेघालयमध्ये एनपीपी ठरणार मोठा पक्ष
-
प्रतिभा धंगेकर म्हणाल्या…भाजपचा खोटारडेपणा निवडणुकीच्या माध्यमातून उघड झाला
निवडणुकीत सर्व काही व्यवस्थित सुरु होते. मात्र भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ देखील घातला होता. मात्र जनतेचा विश्वास आमच्यासोबत असल्याने या निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला असल्याचे प्रतिभा धंगेकर म्हणाल्या.
प्रतिभा धंगेकर म्हणाल्या…भाजपचा खोटारडेपणा निवडणुकीच्या माध्यमातून उघड झाला
-
तिसाव्या फेरीअखेर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप 23307 मतांनी आघाडीवर
तिसाव्या फेरीअखेर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप 23307 मतांनी आघाडीवर
मिळालेली एकूण मते
आश्विनी जगताप - 112113
नाना काटे - 84384
राहुल कलाटे - 38900आश्विनी जगताप 27729 मतांनी आघाडीवर
-
अठ्ठावीसाव्या फेरीअखेर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप 23307 मतांनी आघाडीवर
अठ्ठावीसाव्या फेरीअखेर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप 23307 मतांनी आघाडीवर
मिळालेली एकूण मते
आश्विनी जगताप - 105138
नाना काटे - 81831
राहुल कलाटे - 32178आश्विनी जगताप 23307 मतांनी आघाडीवर
-
आश्विनी जगताप 17,578 मतांनी आघाडीवर
सव्वीसाव्या फेरीअखेर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप यांचं लीड जोरदार वाढलं
मिळालेली एकूण मते
आश्विनी जगताप - 96431
नाना काटे - 78853
राहुल कलाटे - 29624आश्विनी जगताप 17,578 मतांनी आघाडीवर
#electionresults2023 #AssemblyElections #Results #LetsUppMarathi
#kasaba #KasabaPeth #ChinchwadByPoll
-
पंचविसाव्या फेरीअखेर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप यांचं लीड पुन्हा वाढलं
पंचविसाव्या फेरीअखेर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप यांचं लीड पुन्हा वाढलं
मिळालेली एकूण मते
आश्विनी जगताप - 90266
नाना काटे - 76983
राहुल कलाटे - 29200आश्विनी जगताप 13,283 मतांनी आघाडीवर
-
आश्विनी जगताप 9,937 मतांनी आघाडीवर
चोवीसाव्या फेरीअखेर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप लीड दहा हजाराच्या खाली
मिळालेली एकूण मते
आश्विनी जगताप - 84489
नाना काटे - 74552
राहुल कलाटे - 28766आश्विनी जगताप 9,937 मतांनी आघाडीवर
#electionresults2023 #AssemblyElections #Results #LetsUppMarathi
#kasaba #KasabaPeth #ChinchwadByPoll
-
तेविसाव्या फेरीअखेर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप लीड दहा हजाराच्या खाली
तेविसाव्या फेरीअखेर चिंचवडमध्ये आश्विनी जगताप लीड दहा हजाराच्या खाली
मिळालेली एकूण मते
आश्विनी जगताप - 80,174
नाना काटे - 71,216
राहुल कलाटे - 28,420आश्विनी जगताप 8,958 मतांनी आघाडीवर
-
आश्विनी जगताप ११,७१८ मतांनी आघाडीवर
चिंचवडमध्ये एकोणीसावी फेरीनंतर आश्विनी जगताप आघाडीवर
मिळालेली एकूण मते
आश्विनी जगताप - ६७,५५६
नाना काटे - ५५,८३८
राहुल कलाटे - २२,३१७आश्विनी जगताप ११,७१८ मतांनी आघाडीवर
#electionresults2023 #AssemblyElections #Results #LetsUppMarathi
#kasaba #KasabaPeth #ChinchwadByPoll
-
"महाराष्ट्रात कसं बा !" यशोमती ठाकूर यांचा भाजपला टोला
महाराष्ट्रात कसं बा !
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) March 2, 2023
-
हा निकाल महाराष्ट्रातील वातावरण बदलल्याचे संकेत - अशोक चव्हाण
कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय हा महाविकास आघाडीची एकजूट व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय आहे.
जनमताचा हा कौल भाजप विरोधात आहे. हा जनशक्तीचा धनशक्तीवर विजय आहे. हा निकाल महाराष्ट्रातील वातावरण बदलल्याचे संकेत आहेत. काँग्रेस पक्षाने लोकप्रिय व सक्षम उमेदवार दिला आणि त्यांच्या विजयासाठी मतदारांनी सत्ता व पैशाची दडपशाही झुगारून लावली. नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि विजयासाठी परिश्रम घेणार्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व मतदारांचे आभार."
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय हा महाविकास आघाडीची एकजूट व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा विजय आहे. pic.twitter.com/mRbr0dZzSG
— Ashok Chavan (@AshokChavan1958) March 2, 2023
-
अश्विनी जगतापांना मोठी आघाडी…जल्लोषासाठी भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
चिंचवड पोटनिवडणुकीत जगताप यांची विजयाकडे वाटचाल सुरु झाल्याने जगताप समर्थकांची आणि भाजप कार्यकर्त्यांची मतमोजणी केंद्रावर गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे. मतमोजणी केंद्राबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केल्याचं दिसून येतंय.
Pune By-Poll Results 2023 : अश्विनी जगतापांना मोठी आघाडी…जल्लोषासाठी भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
-
चिंचवडमध्ये अठराव्या फेरीनंतर निर्णायक आघाडी, आश्विनी जगताप आघाडीवर
चिंचवडमध्ये अठराव्या फेरीनंतर निर्णायक आघाडी, आश्विनी जगताप आघाडीवर
मिळालेली एकूण मते
आश्विनी जगताप - ६४,०४९
नाना काटे - ४९,९०७
राहुल कलाटे - २०,६१०
-
भाजपचा पराभव आमच्यामुळे, खंत जरूर पण पश्चताप नाही - दवे
भाजपचा पराभव आमच्या मुळे झाला याची खंत जरूर आहे, पण पच्छाताप नाही, असं वक्तव्य ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी केलं आहे. दवे यांनी कसबा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती.
ते म्हणाले की, कसबा, सदाशिव, नारायण येथील सर्व मतदारांनी या वेळेस भाजपच्या विरोधात मतदान केल आहे. मागील वेळेस या प्रभागात मुक्ता ताईंना 20,000 च मताधिक्य मिळाले होते. या वेळेस भाजप येथून १४०० ने मागे पडले. बेगडी हिंदुत्वच्या विरोधात, आर्थिक आरक्षण नाकारण आणि प्रामाणिक, पारंपरिक मतदारांना गृहीत धरण याचा राग आमच्या मुळे व्यक्त झाला. असं दवे म्हणाले.
-
चिंचवडमध्ये पंधराव्या फेरीनंतरही आश्विनी जगताप आघाडीवरच
चिंचवडमध्ये पंधराव्या फेरीनंतरही आश्विनी जगताप आघाडीवरच
मिळालेली एकूण मते
आश्विनी जगताप - ४९,२३९
नाना काटे - ४०,७५७
राहुल कलाटे - १४,९६४
-
'सत्ता, पैसा, गुंडगिरी, धमक्या आणि दबावाला टाचाखाली चिरडत..." धंगेकरांच्या विजयावर रोहित पवार यांच ट्विट
कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हणाले आहे की, "जय हो! सत्ता, पैसा, गुंडगिरी, धमक्या आणि दबावाला टाचाखाली चिरडत मविआ ने भाजपच्या नाकाखालून कसबा विधानसभेची जागा हिसकावून घेतली. हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे! विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर यांचं मनःपूर्वक अभिनंदन!"
जय हो!
सत्ता, पैसा, गुंडगिरी, धमक्या आणि दबावाला टाचाखाली चिरडत #मविआ ने भाजपच्या नाकाखालून #कसबा विधानसभेची जागा हिसकावून घेतली. हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे!
विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर यांचं मनःपूर्वक अभिनंदन! pic.twitter.com/oh5UooSyYQ— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 2, 2023
-
रवींद्र धंगेकर विजयी, आतापर्यंतची एकूण मतमोजणी
रवींद्र धंगेकर विजयी, आतापर्यंतची एकूण मतमोजणी
रवींद्र धंगेकर - ७२,५९९
हेमंत रासने - ६१,७७१रवींद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी निवडून आले आहेत
-
रवींद्र धंगेकर विजयी, भाजपाला मोठा धक्का
कसबा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर विजयी घोषित करण्यात आले आहे. तब्बल ११ हजार ४० मतांनी रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत.
धंगेकर यांचा विजय हा भाजपाला मोठा धक्का बसला आहे. तब्बल २८ वर्षानंतर भाजपच्या हातून कसबा मतदारसंघ गेला आहे.
-
कसब्यात रवींद्र धंगेकर यांच्या विजयाची फक्त औपचारिकता बाकी
कसबा मतदारसंघात अठराव्या फेरीअखेर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना ९,२०० मतांची निर्यायक आघाडी मिळाली आहे. त्यामुळे धंगेकर यांच्या विजयची फक्त औपचारिकता बाकी आहे.
दरम्यान पुण्यात रवींद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली आहे. गुलाल उधळण्यास सुरुवात केली आहे.
-
हेमंत रासने म्हणाले, मी आत्मपरीक्षण करणार
कसबा विधानसभा मतदारसंघात पराभवाच्या छायेत असलेले भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी आपला पराभव मान्य करत मी कुठे कमी पडलो, याचे आत्मपरीक्षण करणार आहे. हा पराभव आपला असल्याे सांगत या वेळी थेट दुरंगी लढत झाल्याने भाजपला फटका बसल्याचे स्पष्टीकरण केले. २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये तिरंगी लढत झाली होती. त्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून येणे सोपे होते. पण पहिल्यांदाच दुरंगी लढत झाली. या निवडणुकीत पैसे वाटप झाल्याचा आरोप करण्यात आला. ईव्हीएम मशीनवर टीका करण्यात आली. आमच्या नेत्यांनी मला उमेदवार म्हणून संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे. माझ्या पक्षाने पूर्ण ताकद लावली. पण उमेदवार म्हणून मी कमी पडलो, अशी माझी भावना आहे.
-
अठराव्या फेरीनंतर रवींद्र धंगेकर यांना निर्णायक आघाडी
अठराव्या फेरीनंतर रवींद्र धंगेकर यांना निर्णायक आघाडी
आतापर्यंतची एकूण मतमोजणी
रवींद्र धंगेकर - ६७,९५३
हेमंत रासने - ५८,९०४अठराव्या फेरीअखेर धंगेकर यांना ९,२०० मतांची आघाडी
अठराव्या फेरीनंतर रवींद्र धंगेकर यांना निर्णायक आघाडी
आतापर्यंतची एकूण मतमोजणी
रवींद्र धंगेकर - ६७,९५३
हेमंत रासने - ५८,९०४#electionresults2023 #AssemblyElections #Results #LetsUppMarathi#kasaba #KasabaPeth #ChinchwadByPoll— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 2, 2023
-
कसबा पोटनिवडणूक मतमोजणी बारावी फेरी अखेर चित्र
https://www.youtube.com/watch?v=9djBNBP3CEQ
-
तेराव्या फेरीअखेर आश्विनी जगताप यांना आठ हजार मतांची आघाडी
चिंचवडमध्ये तेराव्या फेरीनंतरही आश्विनी जगताप आघाडीवरच
मिळालेली एकूण मते
आश्विनी जगताप - ४५,४५०
नाना काटे - ३७,२४६
राहुल कलाटे - १३,३८३तेराव्या फेरीअखेर आश्विनी जगताप यांना आठ हजार मतांची आघाडी
#electionresults2023 #AssemblyElections #Results #LetsUppMarathi
#kasaba #KasabaPeth #ChinchwadByPoll
-
रवींद्र धंगेकर यांची विजयाकडे वाटचाल
रवींद्र धंगेकर यांची विजयाकडे वाटचाल
आतापर्यंतची एकूण मतमोजणी
रवींद्र धंगेकर - ६०,६५७
हेमंत रासने - ५३,२३०सोळाव्या फेरीनंतर रवींद्र धंगेकर यांना सात हजार मतांची आघाडी
रवींद्र धंगेकर यांची विजयाकडे वाटचाल
आतापर्यंतची एकूण मतमोजणी
रवींद्र धंगेकर - ६०,६५७
हेमंत रासने - ५३,२३०सोळाव्या फेरीनंतर रवींद्र धंगेकर यांना सात हजार मतांची आघाडी#electionresults2023 #AssemblyElections #Results #LetsUppMarathi#kasaba #KasabaPeth #ChinchwadByPoll
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 2, 2023
-
बाराव्या फेरीअखेर आश्विनी जगताप यांना ८१९० मतांची आघाडी
चिंचवडमध्ये बाराव्या फेरीनंतर आश्विनी जगताप आघाडीवरच
मिळालेली एकूण मते
आश्विनी जगताप - ४१,८०१
नाना काटे - ३३,६११
राहुल कलाटे - १२,३५७बाराव्या फेरीअखेर आश्विनी जगताप यांना ८१९० मतांची आघाडी
चिंचवडमध्ये मतमोजणीच्या दहा फेऱ्या पूर्ण, आश्विनी जगताप आघाडीवरच
आश्विनी जगताप - ३५,२२८
नाना काटे - २७,७९४
राहुल कलाटे - १०,६६९दहाव्या फेरीअखेर आश्विनी जगताप यांना ७४३४ मतांची आघाडी#electionresults2023 #AssemblyElections #Results #LetsUppMarathi#kasaba #ChinchwadByPoll
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 2, 2023