प्रतिभा धंगेकर म्हणाल्या…भाजपचा खोटारडेपणा निवडणुकीच्या माध्यमातून उघड झाला

प्रतिभा धंगेकर म्हणाल्या…भाजपचा खोटारडेपणा निवडणुकीच्या माध्यमातून उघड झाला

पुणे : राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी व भाजप (BJP) व महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची बनवलेली कसबा (Kasba) व चिंचवड (Chinchwad) निवडणुकीचे कल हाती आले आहे. यामध्ये कसब्यातून काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये आश्विनी जगताप या अजूनही आघाडीवर आहेत. तर निवडणुकीत भाजपाने गोंधळ घातला तरीही रवीभाऊ यांचाच विजय झाला. तसेच या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपचा खोटारडेपणा उघड झाला असल्याचे यावेळी रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी म्हंटले आहे.

मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनामुळे कसब्यात पोटनिवडणुका जाहीर झाल्या होत्या. सुरुवातीपासूनच कसबा व चिंचवड निवडणुका या बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपाने प्रयत्न केला मात्र महाविकास आघाडीने या निवडणुका होणारच असे म्हंटले होते. त्यानुसार महाविकास आघाडीने कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. तर त्यांच्याविरोधात भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasne) हे उभे होते. मात्र या निवडणुकीत धंगेकर यांनी रासने यांना धोबीपछाड देत विजयाचा गुलाल उधळला.

दरम्यान या प्रसंगी काँग्रेसचे विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्याशी लेट्सअप प्रतिनिधीने संवाद साधला. यावेळी बोलताना प्रतिभा धंगेकर म्हणाल्या, निवडणुकीत सर्व काही व्यवस्थित सुरु होते. मात्र भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ देखील घातला होता. मात्र जनतेचा विश्वास आमच्यासोबत असल्याने या निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला असल्याचे प्रतिभा धंगेकर म्हणाल्या.

रिकाम्या पोटी चहा पिण्यापुर्वी हे एकदा वाचा, अन्यथा निर्माण होईल धोका

मुक्ताताईंचा किस्सा…
यावेळी प्रतिभा धंगेकर यांनी दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांचा एक किस्सा देखील सांगितला. त्या म्हणाल्या मी मुक्ता ताई यांना यापूर्वी भेटले होते. यावेळी टिळक मला म्हणाल्या होत्या वाहिनी की तुमचा नवरा खूप काम करतो. दरम्यान रवींद्र भाऊ यांना पहिल्यापासूनच कामाची सवय आहे. यामुळे आता एक प्रभाग असला तरी ते यशस्वीपणे कामे मार्गी लावतील असा विश्वास देखील यावेळी प्रतिभा धंगेकर यांनी व्यक्त केला.

Pathan : शाहरूखच्या पठानची पाचव्या बुधवारीही शानदार कामगिरी

मला भाजपची किंवा येते
या निवडणुकीत भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा मुकाबला पाहायला मिळाला. निवडणुकी दरम्यान भाजपकडून रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका टिप्पणी करण्यात आली. यावर बोलताना प्रतिभा धंगेकर म्हणाल्या, मला भाजपाची किव आली. काम करणाऱ्या एका व्यक्तीवर उगाच तुम्ही टीका करतायत. तुम्ही जी काही आरोप केले ते तुम्ही सिद्ध देखील करू शकले नाही, मात्र आम्ही तरी केलेले आरोप सिद्ध केले आहे. आमच्या कार्यकर्त्यांना धमकावण्यात आले मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून भाजपचा खोटारडेपणा उघडकीस आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube