रिकाम्या पोटी चहा पिण्यापुर्वी हे एकदा वाचा, अन्यथा निर्माण होईल धोका

रिकाम्या पोटी चहा पिण्यापुर्वी हे एकदा वाचा, अन्यथा निर्माण होईल धोका

मुंबई : भारतात बहुतांश लोक सकाळी झोपेतून उठले की चहा पितात. चहा पिणाऱ्यांची संख्या देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. काही लोक दिवसभरात अनेकदा चहा पितात. तर काही लोकांना कॉफी पिण्याची सवय असते. मात्र, चहा-कॉफीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो.

चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रात्री झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिऊ नये. यामुळे रात्रीची झोप खराब होते. तसेच सकाळी रिकाम्या पोटी चहा पिऊ नये. रिकाम्या पोटी चहा न पिण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. दरम्यान आज आपण चहा कधी पिऊ नये व का पिऊ नये याबाबत जाणून घेऊ.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहा आणि कॉफीमध्येही टॅनिन आढळते. त्यामुळे शरीराच्या विकासात अडथळा येतो. चहामध्ये आढळणारे टॅनिन अन्नातून लोह आणि इतर आवश्यक पोषक तत्वांच्या शोषणात व्यत्यय आणतात. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा होत नाही. यासाठी रिकाम्या पोटी चहा पिऊ नका.

डिहायड्रेशनचा वाढता धोका : रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने डिहायड्रेशनचा धोका वाढतो. चहामध्ये असे अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, ज्यामुळे वारंवार लघवीची समस्या उद्भवते. तुम्ही पुरेसे पाणी न पिल्यास डिहायड्रेशन होते. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

kasba Bypoll Result : मी सर्वात आधी गिरीश बापटांना भेटणार.. आमदार झाल्यानंतर धंगेकरांनी सांगितले

अॅसिडीटी : रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने छातीत जळजळ होऊ शकते. यासोबतच अल्सरचा त्रासही वाढतो. हे चहामध्ये असलेल्या ऍसिडमुळे होते. यासाठी रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे.

कसब्याच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंनी थेट भाजपची नीतीच काढली…

पचनप्रक्रिया : रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने मेटाबॉलिज्मवर परिणाम होतो. त्यामुळे पचनक्रियाही बिघडते. चयापचय मंद झाल्यामुळे पचनसंस्था नीट काम करत नाही. यासाठी रिकाम्या पोटी चहा पिऊ नका.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube