कसब्याच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंनी थेट भाजपची नीतीच काढली…

कसब्याच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंनी थेट भाजपची नीतीच काढली…

मुंबई : वापरा आणि फेका अशी भाजपची नीती असून भाजपविरोधातील मतांची संख्या वाढत चालली असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. कसबा आणि चिंचवड निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदत घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, कसब्यात भाजपने दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांचा वापर केला आहे. वापरा आणि फेका अशी भाजपची नीती आहे. दरम्यान, कसब्यात झालेल्या नव्या बदलाचं स्वागत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. चुरशीच्या ठरलेल्या लढतीत कसबा पेठ मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या विजयानंतर ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

रामदास आठवलेंच्‍या पक्षाला नागालँडमध्ये यश; RPI चे 2 उमेदवार विजयी

कसब्याच्या विजयाचा मला आनंद होत असून मतदार आता जागरुक होत आहे. राज्यात भाजपविरोधी मतदारांची संख्या वाढत चालली आहे. आजच्या निकालानंतर त्या आशेला अंकुर फुटला असल्याचा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. भाजपची देशात बेबंदशाही वाढत चालली असून आता त्यांची बेबंदशाही रोखण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं आहे.

यावेळी त्यांनी सत्तासंघर्षाच्या सुनावणीबाबतही भाष्य केलं असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा दिलासादायक असल्याचं त्यांनी म्हंटलय. तसेच आता आमची शेवटची आशा ही सर्वोच्च न्यायालयच असल्याचं म्हंटलय. निवडणूक आयुक्त नेमणं हा राष्ट्रपतींचा अधिकार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

17 गोण्या कांदा विकून हातात आला 1 रुपया!, ‘सरकार, सांगा आम्ही जगायचं कसं ?’

नूकताच कसब्याच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महाविकास आघाडीने भाजपच्या ताब्यात असलेला कसबा मतदारसंघ हिसकावून घेतला आहे. अर्थात भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव करुन महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकरांनी विजय मिळवला आहे. धंगेकरांच्या विजयावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chinchwad By Election : कलाटेंनी काटेंची ‘शिट्टी’ वाजवली, तर अश्विनी जगतापांची विजयाकडे वाटचाल…

दरम्यान, पुण्यातील कसब्याचा निकाल जाहीर झाला असून अद्याप चिंचवडच मतदारसंघाची मतमोजणी सुरु आहे. चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप मोठ्या मताधिक्क्याने पुढे असल्याचं समोर येत आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे पिछाडीवर आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube