Election Results 2023 Live : नागालॅंड भाजपपुढे पण मेघालयमध्ये एनपीपी ठरणार मोठा पक्ष
शिलॉंग : त्रिपुरा, नागालॅंड आणि मेघालय विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून 3 तासांची मोजणी पूर्ण झाली आहे. या तिन्ही राज्यांत सर्व जागांवरील कल पुढे आले आहेत. नागालॅंड आणि त्रिपुरामध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. मेघालयमधेये एनपीपी मोठा पक्ष म्हणून पुढे येत आहे.
नागालॅंडमध्ये भाजपा युतीला 41 जागांवर आणि त्रिपुरामध्ये 31 जागांवर पुढे आहे. मेघालयमध्ये एनपीपी 25 जागांवर पुढे आहे. भाजपा येथे फक्त 5 जागांवरच आटोपताना दिसत आहे. एग्झिट पोल्समध्ये मात्र त्रिपुरा-नागालॅंडमध्ये भाजपा युतीला बहुमताचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मेघालयमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
Election Results 2023 Live : त्रिपुरामध्ये भाजप आणि डाव्यांमध्ये निकराची लढत, दोन्ही पक्ष आघाडीवर
मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला 59 जागांसाठी मतदान घेण्यात आलं 85.27% मतदान झालं. यूडीपी उमेदवार एचडीआर लिंगडोह यांच्या निधनामुळे सोह्योंग जागेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली. 2018 मध्ये 67% मतदान झाले होते. यावेळी एनपीपीने 57, काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी 60 आणि टीएमसीने 56 जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत.
नागालॅंडच्या 16 जिल्ह्यांमध्ये 27 फेब्रुवारीला 59 जागांसाठी मतदान घेण्यात आलं. 85.90% मतदान झालं. अकुलुतो मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार खेकाशे सुमी यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार काजेतो किनीमी यांची बिनविरोध निवड झाली. नागालँडमध्ये सध्या नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीची सत्ता आहे. नेफियू रिओ हे मुख्यमंत्री आहेत.
ईशान्येकडील विधानसभा निवडणुकीत त्रिपुरातील 60, मेघालयातील 59 आणि नागालँडमधील 60 जागांसाठी कल आलेला आहे. या ट्रेंडमध्ये भाजप आघाडीला नागालँडमध्ये 46 आणि त्रिपुरामध्ये 35 जागा मिळताना दिसत आहेत. NPP 25 जागांसह मेघालयातील सर्वात मोठा पक्ष आहे. एक्झिट पोलमध्येही हाच अंदाज व्यक्त करण्यात आला होता.