Election Results 2023 Live : त्रिपुरामध्ये भाजप आणि डाव्यांमध्ये निकराची लढत, दोन्ही पक्ष आघाडीवर

Election Results 2023 Live : त्रिपुरामध्ये भाजप आणि डाव्यांमध्ये निकराची लढत, दोन्ही पक्ष आघाडीवर

अगरताळा : त्रिपुरामध्ये विधानसभा 2023 च्या निवडणुकीत, भाजपने सर्व 60 जागांवर, डाव्या-काँग्रेस आघाडीने (अनुक्रमे 47 आणि 13 जागा) जागांवर निवडणूक लढवली. टिपरा मोथा पक्षाने 42 जागांवर निवडणूक लढवली. त्यामुळे राज्यात तिरंगी लढत अपेक्षित आहे. कारण त्रिपुरामध्ये भाजप आणि डाव्यांमध्ये निकराची लढत आहे. सुरूवातीच्या कलानुसार दोन्ही पक्ष आता 23-23 जागांवर आघाडीवर आहेत. यापूर्वी भाजप आघाडीला बहुमत मिळाले होते.

त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारीला 60 जागांसाठी मतदान घेण्यात आलं. यामध्ये 86.1 0% मतदान झालं. गेल्या विधानसभेच्या तुलनेत हे मतदान 4% कमी झालं. 2018 मध्ये त्रिपुरामध्ये 59 जागांसाठी 90% मतदान झालं होत. त्यावेळी भाजपने 35 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर डाव्यांच्या 25 वर्षांच्या गडाला त्यांनी धक्का लावला होता. त्यावेळी बिप्लब देव हे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर मात्र मे 2022 मध्ये माणिक साहा यांना मुख्यमंत्री करण्यात आलं होत.

Pune By-Poll Results 2023 : पहिल्या नऊ फेरीत धंगेकर आघाडीवर, रासनेंचे टेंशन वाढले

ईशान्येकडील विधानसभा निवडणुकीत त्रिपुरातील 60, मेघालयातील 59 आणि नागालँडमधील 60 जागांसाठी कल आलेला आहे. या ट्रेंडमध्ये भाजप आघाडीला नागालँडमध्ये 46 आणि त्रिपुरामध्ये 35 जागा मिळताना दिसत आहेत. NPP 25 जागांसह मेघालयातील सर्वात मोठा पक्ष आहे. एक्झिट पोलमध्येही हाच अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube