Pune By-Poll Results 2023 : अश्विनी जगतापांना मोठी आघाडी…जल्लोषासाठी भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

Pune By-Poll Results 2023 : अश्विनी जगतापांना मोठी आघाडी…जल्लोषासाठी भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीत होत असलेल्या तिरंगी लढतीत अखेर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांची सोळाव्या फेरीअखेरीस वाटचाल सुरु आहे. जगताप यांची विजयाकडे वाटचाल सुरु झाल्याने जगताप समर्थकांची आणि भाजप कार्यकर्त्यांची मतमोजणी केंद्रावर गर्दी जमण्यास सुरुवात झाली आहे. मतमोजणी केंद्राबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केल्याचं दिसून येतंय.

भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना सोळाव्या फेरीत 56 हजार 680 मते मिळाली आहेत. तर महाविकास आघाडीचे राहुल काटे यांना 49 हजार 906 मते मिळाली आहेत. तर या पोट निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंना आपल्या पारड्यात 18 हजार 542 मते मिळवण्यात यश आलंय.

अद्यापही मतमोजणीच्या एकूण 4 फेऱ्या बाकी असून जगताप 6 हजार 774 मतांनी आघाडीवर असल्याचं चित्र सध्या दिसून येतंय. पुढील 4 फेऱ्यांमध्ये मतदारांनी नाना काटेंच्या पारड्यात मते दिली असतील तर नाना काटे जगतापांना पिछाडीवर टाकत पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Chinchwad Bypoll Election Result : “कसबा आणि चिंचवडचा निकाल हा लोकशाहीच्या बाजूने लागणार”, रोहित पवारांचा विश्वास

तर दुसरीकडे भाजपचाच उमेदवार विजयी होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. विजयानंतर जल्लोष साजरा करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी चिंचवडमधील मतमोजणी केंद्रावर एकच गर्दी केलीय.

महिन्याभरापासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा आणि पिंपरी-चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरु आहे. कसबा पेठ मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. धंगेकरांनी भाजपचा गडाला खिंडार पाडल्याचं चित्र कसब्यात दिसून आलंय.

Pune By-Poll Results 2023 : भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, सदाशिव, नारायण, शनिवार पेठेत काँग्रेसला अभुतपूर्व प्रतिसाद

भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करत रविंद्र धंगेकरांनी कसब्यात महाविकास आघाडीचा झेंडा रोवला आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या उमदेवाराकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवाची चिन्हे दिसून येत आहेत.

दरम्यान, एकंदरीत चिंचवडमध्ये आत्तापर्यंतच्या निकालांच्या चित्रावरुन अश्विनी जगताप भाजपचा गड राखणार असल्याचं चित्र दिसतयं. कारण जगताप आणि काटे यांच्यामध्ये मतांचा मोठा असल्याचं दिसतंय. भाजपचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना असल्याने कार्यकर्त्यांकडून चिंचवड परिसरात मोठी गर्दी करण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube