Nana Patole on PM Modi : लोकसभा निडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) भाजप आणि मोदी सरकावर घणाघाती टीका केली. भाजपच्या (BJP) नेत्यांनी केवळ भडकाऊ भाषणं करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षे सत्तेत राहूनही त्यांच्याकडे सांगण्यासासारखे काहीच नाही. ते खोटं बोलून दुष्प्रचार करत आहे. पण, जनता त्यांच्या भूलथापाांना बळी पडणार नाही, देशात आणि राज्यात परिवर्तन निश्चित असल्याचा दावा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
सांगलीच्या खासदारकीसाठी पैज लावणं पडलं महागात; पोलिसांकडून दुचाकी ताब्यात घेत गुन्हाही दाखल
नाना पटोलेंनी आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पटोलेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात सभा आणि रोड शो केले. भडकाऊ विधानं करून धार्मिक ध्रवीकरण करण्याचा प्रयत्न केला. दहा वर्षे सत्तेत राहूनही त्यांच्याकडे सांगण्यासासारखे काहीच नाही. भाजपने देशभरातून अनेक नेत्यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी उतरवले होते, पण त्यांच्या या स्टार प्रचारकांचा कुठेही प्रभाव पडला नाही. रोड शोच्या नावाखाली नरेंद्र मोदींनी मुंबईला वेठास धरण्याचं काम केलं, अशी टीका त्यांनी केली.
देशात परिवर्तन अटळ! जनता भाजप आणि मित्रपक्षांचा सुफडा साफ करणार; कॉंग्रेस नेत्याचा दावा
ते म्हणाले, गुजरात आणि बाहेरून लोकं आणावी लागली. राज्यातील जनतेने भाजपच्या प्रचाराला प्रतिसाद तर दिलाच नाही, उलट अनेक ठिकाणी भाजपच्या लोकांना आणि उमेदवारांना लोकांनी गावातही येऊ दिलं नाही.
योगी घुसखोरीवर का बोलत नाहीत?
पटोल म्हणाले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भगवे कपडे घालून धडाधड खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रृजभूषण सिंग याने महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करून त्यांच्यावर अन्याय केला यावर योगी गप्प का? चीनच्या घुसखोरीबद्दल ते का बोलत नाहीत? पीओकेचे भारतात विलीनीकरण 6 महिन्यांत करण्याच्या गप्पा मारणाऱ्या योगांनी 10 वर्षांत ते का होऊ शकले नाही, हे सांगितलं पाहिजे. योगी आणि भाजपच्या नेत्यांकडे जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या समस्यांवर सांगण्यासारखं काहीच नाही, अशी टीका पटोलेंनी केली.
देशात बोकाळेला भ्रष्टाचार, तानाशाह व्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर, बेरोजगारी, शेतकऱ्यांवर होणारा अन्याय यावर ना देशाचे पंतप्रधान बोलले, ना राज्याचे मुख्यमंत्री. त्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड रोष आहे. ही नाराजी आता मतदानातून व्यक्त होणार आहे, जनता त्यांच्या भूलथापाांना बळी पडणार नाही, देशात आणि राज्यात परिवर्तन होऊन भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा सुफडा साफ होणार पटोले यांनी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वादात आम्हाला रस नाही. हुकूमशाही वृत्तीच्या भाजपला सत्तेवरून हटवणे हाच आमचा उद्देश आहे. भाजपने महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम केले आहे. शवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र पुनर्स्थापित करण्याचं काँग्रेसचे उद्दिष्ट आहे, असं पटोले म्हणाले.