Download App

महाराष्ट्राचा उडता पंजाब करू नका, ड्रग्ज प्रकरणावरून पटोलेंनी शिंदे सरकारला सुनावलं

  • Written By: Last Updated:

Nana Patole : नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण राज्यभर गाजत आहे. काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला. या घटनेला ऩऊ दिवस झाले. दरम्यान, या ड्रग्ज प्रकरणारून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झटत आहेत. कॉंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी ललित पाटीलला महिला पुरवल्या जात होत्या, असा खळबळजनक आरोप केला. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) महाराष्ट्राचा उडता पंजाब करून नका, अशा शब्दात शिंदे सरकारला सुनावलं.

सिक्सर किंग रोहित शर्माने झळकावले शतक, कपिल देव-सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला 

अमरावती येथे प्रदेश काँग्रेसची आढावा बैठक पार पडली, त्यावेळी नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पटोलेंना ड्रग्ज प्रकरणाविषयी विचारले असता ते म्हणाले की, नाशिकमधील ड्रग्जचे लोण अमरावतीसारख्या शहरातही पसरत आहे. शाळा-महाविद्यालयांमधील मुलांना अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढले जात आहे, हे अत्यंत गंभीर आहे. नाशिकमधील प्रकरणाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी. तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा हा प्रकार थांबवणं गजरेचं आहे. सरकारने महाराष्ट्राचा उडता पंजाब करू नये. राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाशिवाय अमली पदार्थांची तस्करी अशक्य असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

ते म्हणाले की, ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी कोणी मदत केली हे समोर येत आहे. ललित पाटील बेपत्ता कसा झाला? त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोण करत आहे, याची सर्व माहिती आमच्याकडे आहे, योग्य वेळी ती आम्ही जाहीर करू, मात्र तरुणांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना कुणीही पाठीशी घालू नये, असं पटोले म्हणाले.

जागावाटपाचा निर्णय अद्याप झाला नाही. त्यावर बोलतांना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आपल्याच पक्षाने सीट लढवावी, असं वाटतं. त्यांचंयोग्यच आहे. पण, जागावाटपाचा निर्णय गुणवत्तेच्या आधारावर घेतला जाईल, असं सांगत लोकशाही मान्य नसलेल्या भाजपला सत्तेबाहेर काढणं, हेच आमचं काम आहे, असं ते म्हणाले.

गुजरात सरकारने आज मुंबईत व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाच आयोजन केलं. गुजरातमधील उद्योगधंदे वाढावे, यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे हेही हजर राहणार होते. याविषयी बोलतांना पटोले म्हणाले की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे लोक आहोत, शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती, पण आजचे राज्यकर्ते महाराष्ट्र लुटून सुरतेला देत आहेत. सरकारमध्ये लोक गुजरातचे हस्तक आहेत, हे त्यांनीच जाहीरपणे सांगितले आहे, असा टोलाही पटोलेंनी लगावला

Tags

follow us