Download App

‘गरिब समाजातून आलो’, मोदींच्या विधानावर पटोलेंचा सवाल, एससी, एसटींची आत्ताच आठवण का?

  • Written By: Last Updated:

Nana Patole on PM Modi : नितीन गडकरींन (Nitin Gadkari) रामटेकच्या सभेत बोलतांना कॉंग्रेसवर सडकून केली. काँग्रेसला (Congress) गेल्या साठ वर्षांच्या कार्यकाळात जो विकास साधता आला नाही, तो विकास पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली १० वर्षांत झाल्याचं विधान त्यांनी केलं. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक गरिबाचा मुलगा पीएम झाला तर लोकशाही धोक्यात आल्याची टीका कॉंग्रेस करते. गरिबांना कॉंग्रेस पुढं जाऊ देणार नाही, अशी टीका मोदींनी केली. त्यांच्या टीकेचा आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) खरपूस समाचार घेतला.

संविधान तोडण्याचे काम काँग्रेसनेचं केलं; नितीन गडकरींची घणाघाती टीका 

गरिब असल्याचं सांगत सहानुभूती मिळवली…
पीएम मोदींच्या सभेनंतर पटोलेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा आपण गरिब समाजातून आल्यानेच विरोधक आपल्याला शिव्या देतात, असं सांगून सहानूती मिळण्याचा प्रयत्न केला, पण 20 लाख रुपयांचा सूट, 3 लाख रुपयांचा चष्मा, 1.5 लाख रुपयांचा पेन आणि 8 हजार कोटीचे विमान वापरणारे मोदी गरिब कसे? हा प्रश्न देशातील गरीब जनतेला पडला आहे, अशी गरिबी या समाजाला का लाभली नाही, याचे उत्तर मोदींनी दिलं पाहिजे, असं पटोले म्हणाले.

Pm Narendra Modi : …तर बाबासाहेबांचं संविधान संपूर्ण भारतात लागू करण्याची हिंमत का नाही दाखवली? 

ते म्हणाले, मोदींना निवडणुका आल्या की, गरिब, दलित, आदिवासी, ओबीसींची आठवण येते. मोदी सरकारने 10 वर्षात या समाजासाठी काहीही केले नाही. गेल्या 10 वर्षात या समाजघटकांवर अगणित अत्याचार केले गेले. मोदी सरकारमुळेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. आदिवासींच्या जमिनी हिसकावून उद्योगपतींना दिल्या, गोरगरिबांना आणखी गरीब केले आणि लोकसभा निवडणुका सुरू झाल्या, तेव्हा तुम्हाला एससी, एसटी, आदिवासी समाज आठवला का? असा सवाल पटोलेंनी केला.

महिला, आदिवासींचा अपमान 
10 वर्षात SC, ST आणि आदिवासी समाजाचा विकास केल्याचा मोदींचा दावा खोटा आहे. उलट मोदी सरकारने मागासवर्गीय समाजाच्या कल्याणकारी योजनांच्या बजेटमध्ये कपात केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापासून वंचित ठेवले, अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापासून वंचित ठेवून राष्ट्रपती, महिला महिला आणि आदिवासी समाजाचा अपमान केल्याची टीका पटोलेंनी केली.

follow us

वेब स्टोरीज