Download App

नांदेडमध्ये पाच महिन्यांत मोठी उलथापालथ! लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय

  • Written By: Last Updated:

Nanded Loksabha By Poll Santuk Hambarde Win : राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने दणक्यात यश मिळवलं आहे. महायुतीचा विजयाचा हा पॅटर्न नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत (Nanded Loksabha) देखील कायम दिसला. नांदेड लोकसभा मतदार संघामध्ये पाच महिन्यांपूर्वी काँग्रेस (Congress) उमेदवार विजयी झाला होता. परंतु आता मात्र या निकालात मोठी उलथापालथ झालीय. पाच महिन्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजप (BJP) उमेदवार विजयी झालाय.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडीचा पराभूव झाला आहे. भाजप पुन्हा एकदा युती सरकार स्थापन करणार आहे. दरम्यान, नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये देखील भाजपने बाजी मारली. येथे भाजपच्या उमेदवाराने काँग्रेसचा दारुण पराभव केला. नांदेड पोटनिवडणुकीचा निकालही काँग्रेससाठी त्रासदायक आहे, कारण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा जिंकली होती.

Assembly Election Result : लाडक्या बहिणींची कमालच! उत्तर महाराष्ट्रात दिली एकहाती ‘सत्ता’…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकावण्यासोबतच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतही भाजपची जुगलबंदी सिद्ध झाली. येथून भाजपचे उमेदवार डॉ. संतुकराव हुंबर्डे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांचा दारूण पराभव केला. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, संतुक राव यांना 500368 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र चव्हाण (442279) दुसऱ्या क्रमांकावर तर वंचित बहुजन आघाडीचे अविनाश विश्वनाथ (61224) तिसऱ्या क्रमांकावर होते.

सुनील केदारांना मोठा धक्का, सावनेरमध्ये पत्नीचा दारूण पराभव, आशिष देशमुख 26 हजार मतांनी विजयी

एप्रिल-मे महिन्यामध्ये झालेल्या लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघात प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होती. त्यावेळी वसंत चव्हाण 59 हजार 442 मतांनी विजयी झाले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील ही जागा भाजपनं जिंकली होती. त्यावेळी प्रतापराव गोविंदराव चिखलीकर खासदार झाले होते.

 

follow us