BJP Announced first list? : भाजपची पहिली लिस्ट जाहीर होण्याची शक्यता; ‘ही’ नाव रेड झोनमध्ये

  • Written By: Published:
BJP Announced first list? : भाजपची पहिली लिस्ट जाहीर होण्याची शक्यता; ‘ही’ नाव रेड  झोनमध्ये

Maharashtra Assembly Election 2024 : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असल्याने भाजपकडून आज पहिली उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. (BJP) या उमेदवारी यादीत 100 उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत भाजपच्या 100 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जातं आहे.

भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीतील 100 उमेदवारांची नावं निश्चित करताना गेल्या पाच वर्षांमधील त्यांची कामगिरी हा प्रमुख निकष होता. याशिवाय, संबंधित उमेदवार सोशल मीडियातून लोकांपर्यंत कसा पोहोचला, ही गोष्टही ध्यानात घेण्यात आली. अनेक विद्यमान आमदारांच्या कामगिरीवर पक्ष नाराज आहे. त्यांच्याऐवजी संबंधित मतदारसंघात नव्या आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

साकोलीतून नाना पटोले तर, ब्रह्मपुरीतून वडेट्टीवार?,त्या व्हायरल यादीवर काँग्रेसचं स्पष्टीकरण

भाजपचे मुंबईतील पाच आमदार खराब कामगिरीमुळे रेड झोनमध्ये असल्याची चर्चा आहे. यामध्ये राम कदम, भारती लव्हेकर, सुनील राणे, पराग शाह आणि तामिल सेल्वन यांचा समावेश असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे आजच्या यादीत या पाच आमदारांचा समावेश असणार की नाही, हे पाहावं लागंणार आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube