Download App

Narayan Rane : राणेंनी ठाकरेंना सुनावलं; शिंदे मंत्री असताना कुणाला पैसे देत होते?

मुंबई :  भाजपचे ( BJP )  ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane )  यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंवर ( Uddhav Thackarey ) हल्लाबोल केला आहे. यावेळी ते मुंबई येथे विधानभवनाच्या परिसरात माध्यमांशी बोलत होते. ठाकरे यांच्या खेडच्या सभेला जमवलेली गर्दी होती, असे ते म्हणाले आहेत. राज्याचे सध्या अर्थसंसल्पीय अधिवेशन सुरु आहे. उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्याअगोदर राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ठाकरेंवर टीका केली.

पिके भुईसपाट, भाव नसल्याने कोथिंबीर फुकट.. शेतकऱ्यांना काय मदत करणार सांगा ? ; अजितदादांनी विचारला जाब

उद्धव ठाकरे यांच्या खेडच्या सभेला जमवून माणसे आणली होती. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मुंबई या भागातून सभेला गर्दी गोळ्या करण्यात आली होती. तसेच खुर्च्या लावताना पण अंतर सोडून लावण्यात आल्या होत्या. उद्धव ठाकरे यांना काय बोलता येते गेल्या अडीच वर्षात त्यांनी राज्यासाठी काहीही केलेले नाही. कोकणासाठी एकही नवी नवीन योजना दिलेली नाही. त्यांच्या काळात झालेल्या अतिवृष्टीचे पैसे देखील देण्यात आले नव्हते, अशा शब्दात राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मी आणि एकनाथ शिंदे यांनी अनेक खोके हे उद्धव ठाकरे यांच्या हातात दिले आहेत. एकनाथ शिंदे मंत्री असताना कुणाला जाऊन पैसे देत होता? असा सवालही राणेंनी यावेळी उपस्थित केला.

ठाकरे हे मुख्यमंत्री असताना फक्त अडीच तास मंत्रालयात गेले होते. त्यामाणसाकडून तुम्ही काय अपेक्षा करता. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काहीही ताकद नाही. त्यांच्यात मंत्रालयात यायची ताकद नव्हती ते महाराष्ट्र काय पिंजून काढणार, असा घणाघात राणेंनी ठाकरेंवर केला आहे. दोन पावले चालले तर यांना दम लागतो आणि हा कसला घणाघात करणार, अशी टीका राणेंनी ठाकरेंवर केली आहे.

Tags

follow us