पिके भुईसपाट, भाव नसल्याने कोथिंबीर फुकट.. शेतकऱ्यांना काय मदत करणार सांगा ? ; अजितदादांनी विचारला जाब

पिके भुईसपाट, भाव नसल्याने कोथिंबीर फुकट.. शेतकऱ्यांना काय मदत करणार सांगा ? ; अजितदादांनी विचारला जाब

Maharashtra Budget : राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पडसाद विधीमंडळाच्या अधिवेशनात (Maharashtra Budget) उमटू लागले आहेत. अधिवेशनात आज सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी हा मुद्दा उपस्थित केला. याच मुद्द्यावर विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके अक्षरशः भुईसपाट झाली. गहू, कांदा, टोमॅटो, हरभरा, मका, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले. मेंढ्या, पाळीव प्राणीही दगावले. नुकसान पाहून शेतकरी स्वतःलाच मारून घेत आहे. दुसरीकडे पिकाला भाव मिळत नसल्यानेही शेतकरी हवालदिल झाले आहेत, अशा परिस्थितीत सरकारने तातडीने पावले उचलावीत. शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. त्यावर सभापती राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्तावावेळी यावर सविस्तर चर्चा करण्याचे आश्नासन दिले.

वाचा : Live Blog | Maharashtra Budget Session : कांदा प्रश्नांवर विरोधक आक्रमक, विधिमंडळात काय चालू आहे? 

राज्यात मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील पिके वाया गेली आहेत. कांदा, कापूस, मका, हरभरा, गहू अशा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी प्रचंड वाढल्या आहेत. आणखीही काही दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या परिस्थितीचा विचार करून सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी पवार यांनी केली.

शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन, कांद्याचे पार्सल पाेस्टाद्वारे थेट पंतप्रधानांकडे

त्यानंतर याच मुद्द्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनीही सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याची मागणी केली.

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती मागवली आहे. पंचनाम्यांनंतर तत्काळ मदतीचे प्रस्तावही मागविले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.

https://www.youtube.com/watch?v=vev7UU9ANZA

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube