Live Blog | Maharashtra Budget Session : उद्धव ठाकरे आज विधानभवनात, विरोधक आक्रमक
महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून होळीच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरु होत आहे. त्यामुळे धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर नक्की काय राजकीय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान कांदा भावाचा प्रश्न आणि १२वीचे पेपरफुटी या प्रश्नावरून सत्ताधारी विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कालच कांदा प्रश्नावरून सरकारवर टीका केली होती. उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे आज आर्थिक पाहणी अहवाल सभागृहात सादर केला जाईल.
विधिमंडळ संपूर्ण अपडेट पहा
LIVE NEWS & UPDATES
-
शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी
एकीकडे शेतकरी शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे सुलतानी संकटाला सामना करत होता, त्यातच अवकाळी पावसाने भर घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर अस्मानी संकटाने घाला घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी भूमिका अंबादास दानवे यांनी घेतली.
एकीकडे शेतकरी शेतमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे सुलतानी संकटाला सामना करत होता, त्यातच अवकाळी पावसाने भर घातल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर अस्मानी संकटाने घाला घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी आग्रही भूमिका घेतली. pic.twitter.com/CHWUEd6oM5
— Ambadas Danve (@iambadasdanve) March 8, 2023
-
Bacchu Kadu : ‘या’ प्रकरणावरून आमदार बच्चू कडू यांना २ वर्षांची शिक्षा
नाशिक : अपक्ष आमदार बच्चू कडू यांना सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणे त्यांना चांगलेच भोवले आहे. नाशिक महापालिका आयुक्तांवर (Nashik Municipal Commissioner) आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होते. यावरून हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. ( MLA Bacchu Kadu sentenced to two years) या प्रकरणात बच्चू कडू यांना कोर्टाने २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.
Sanjay Raut ‘त्या’ वक्तव्यावर ठाम, ‘माझे विधान एका विशिष्ट गटापुरते मर्यादित’
-
40 टक्के सवलतीबाबत विधी मंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे आंदोलन
मुंबई : पुण्यातील मिळकतींचा शास्तीकर रद्द करून मिळकत करातील 40 टक्के सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Govt) तातडीने घ्यावा. यासाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने विधिमंडळाच्या (Legislature) पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
NCP : राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?
-
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेचा प्रस्ताव नाकारला, संतप्त विरोधकांनी केला सभात्याग
ज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यातील अवकाळी पावसाचा मुद्दा चांगलाच गाजला. या मुद्द्यावर आज चर्चा व्हावी ही मागणी लावून धरली. फक्त शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र यास विधानसभा अध्यक्षांनी नकार दिल्याने संतप्त होत विरोधी पक्षांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके अक्षरशः भुईसपाट झाली. गहू, कांदा, टोमॅटो, हरभरा, मका, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले. मेंढ्या, पाळीव प्राणीही दगावले. नुकसान पाहून शेतकरी स्वतःलाच मारून घेत आहे. दुसरीकडे पिकाला भाव मिळत नसल्यानेही शेतकरी हवालदिल झाले आहेत, अशा परिस्थितीत सरकारने तातडीने पावले उचलावीत. शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेचा प्रस्ताव नाकारला, संतप्त विरोधकांनी केला सभात्याग
-
सरकारने तातडीने पावलं उचलून शेतकऱ्यांसाठी मदत करावी
शेतमालाचे कोसळलेले भाव, निर्यातबंदी यांमुळे आधीच त्रस्त असलेला महाराष्ट्रातील बळीराजा अवकाळी पावसामुळे अक्षरशः कोलमडून पडलाय. शेतकऱ्यांवर देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत सरकारने तातडीने पावलं उचलून शेतकऱ्यांसाठी मदत उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. अशी मागणी छगन भुजबळ यांनी विधानभवनात केली.
शेतमालाचे कोसळलेले भाव, निर्यातबंदी यांमुळे आधीच त्रस्त असलेला महाराष्ट्रातील बळीराजा अवकाळी पावसामुळे अक्षरशः कोलमडून पडलाय. शेतकऱ्यांवर देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत सरकारने तातडीने पावलं उचलून शेतकऱ्यांसाठी मदत उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. pic.twitter.com/tHtNgtzjtM
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) March 8, 2023
-
शेतकऱ्यांना काय मदत करणार सांगा ? अजितदादांनी विचारला जाब
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पिके अक्षरशः भुईसपाट झाली. गहू, कांदा, टोमॅटो, हरभरा, मका, ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले. मेंढ्या, पाळीव प्राणीही दगावले. नुकसान पाहून शेतकरी स्वतःलाच मारून घेत आहे. दुसरीकडे पिकाला भाव मिळत नसल्यानेही शेतकरी हवालदिल झाले आहेत, अशा परिस्थितीत सरकारने तातडीने पावले उचलावीत. शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली.
-
Chagan Bhujbal : होळीच्या दिवशीच शेतकऱ्यांच्या आयुष्याचा बेरंग झाला
अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तो हवालदिल झाला. त्याच्या संसाराची होळी झाली आहे. आणि इकडे नेते रंग उधळत आहे असा टोला छगन भुजबळ यांनी लावत गुजरात सरकार प्रमाणे महाराष्ट्रातही अनुदानाच्या बाबत निर्णय व्हावा अशी मागणी त्यांनी केली. छगन भुजबळ यांनी कांदा, द्राक्ष यांसह राज्यातील सर्वच पिकांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यावरून छगन भुजबळ यांनी मदत मिळावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली.
Chagan Bhujbal : होळीच्या दिवशीच शेतकऱ्यांच्या आयुष्याचा बेरंग झाला
-
शेतकऱ्यांसाठी मविआ आक्रमक, विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी…
मुंबई : राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात (budget session) आवाज उठवणार असे काल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले होते. यानंतर आज सुरु झालेल्या अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार निदर्शने केली.
शेतकऱ्यांसाठी मविआ आक्रमक, विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी…
-
राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये १३,७२९ हेक्टर शेतीचं नुकसान
अवकाळीमुले राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये १३,७२९ हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अधिवेशनात दिली.त्यावेळी राज्यात झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तसेच विरोधकांनी राजकारण करू नये, असं देखील ते यावेळी म्हणाले.
-
सरकारची शेतकऱ्यांबाबत भूमिका काय, नाना पटोले यांचा सवाल
शेतकऱ्यांच्या पिकांची राखरांगोळी झाली आहे. त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं. यापेक्षा मोठं काय होऊ शकतं. असा सवाल नाना पटोले यांनी विधिमंडळात विचारला.
ते म्हणाले की, हे सगळं कामकाज बंद केलं पाहिजे. आज सरकारची शेतकऱ्यांबाबत भूमिका काय आहे? मागील आठवड्यातही कांदा-कापूस शेतकऱ्यांच्या प्रश्न समोर आला होता.