Maharashtra politics : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याप्रमाणे मानसिक आजार झाला आहे. मानसिक आजार झाल्यानंतर एखादी गोष्ट घडलेली नसली तरी अशी गोष्ट घडलेली आहे असं वाटतं. अशीच अवस्था आदित्य ठाकरे यांची झालेली आहे. त्यांना मानसोपचार तज्ञांची गरज आहे, असा हल्लाबोल शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये गौप्यस्फोट केला होता. यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. ईडीकडून अटक होईल या भीतीने एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडत होतो. याच भीतीने त्यांनी शिवसेनेत बंड केले आणि भाजपसोबत गेले, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता. यावर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आदित्या ठाकरे यांच्या टीका केली आहे.
वाशीमचे राजकीय भूकंप! काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा भाजपात प्रवेश…
नरेश म्हस्के पुढं म्हणाले की आम्ही जर म्हटलं की उद्धव ठाकरे देखील मुख्यमंत्रीपद वाचवा म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे फोनवर गयावया करत होते तर तुम्ही खरं म्हणणार आहेत का? एकनाथ शिंदे हे मास लीडर आहेत. घरात मासा मेला म्हणून दारं बंद करून रडणारे नाहीत. आम्ही रडणारे नसून रडवणारे आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नरेश म्हस्के म्हणाले की महाविकास आघाडीची पंतप्रधानांकडे मिटींग होती. त्यावेळी सर्व नेत्यांना बाजूला ठेऊन उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. ठाकरेंना आणि त्यांच्या नातेवाईंकांना ईडीकडून नोटीस आल्यामुळे नरेंद्र मोदींकडे ते गयावया करत होते. ठाकरेंची परदेशात किती संपत्ती आहे याचे पुरावे आमच्याकडे आहेत. वेळ आली तर सर्व उघड करु, असा नरेश म्हस्के यांनी दिला आहे.