वाशीममध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा भाजपात प्रवेश…

वाशीममध्ये राजकीय भूकंप! काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा भाजपात प्रवेश…

विदर्भात काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळख असलेले माजी खासदार अनंत देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्याचे राजकीय समीकरणं बदलणार असल्याचं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अऩंत देशमुख यांचा मुलगा नकूल देशमुख यांनीही भाजपात प्रवेश केलाय.

Eknath Shinde : मी सगळ्यांना घरातून बाहेर आणलं, काम करू लागले; आजारी लोक बरे झाले

देशमुख यांना रिसोड मालेगाव भागांत मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. या दोन्ही तालुक्यांत त्यांची चांगली पकड आहे. मागील विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष मैदानात उतरले होते. निवडणुकीत अमित झनक यांनी मोजक्याच मतांनी त्यांचा पराभव केला.

देशमुख यांचा पराभव झाल्यानंतर ते काही काळ काँग्रेस पक्षापासून अलिप्त होते. काही दिवसांपूर्वीच आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. अखेर आज अऩंत देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय.

पडद्यामागच्या रश्मी ठाकरे आता प्रत्यक्ष राजकारणात; नाशिक दौऱ्यातून सक्रिय राजकारणाची सुरुवात?

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करीत आहे. हे अनंत देशमुखांना उमगल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील अडीच वर्षांत राज्यात नाकर्ते सरकार होतं. अशी टीकाही त्यांनी यावेळी केलीय.

खासदार विनायक राऊत यांची मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघाती टीका

तसेच मागील अडीच वर्षांत विदर्भासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एकही निर्णय घेतलेला नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर संत सेवालाल महाराजांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपये दिले आहेत. याआधीही आमच्या काळात 100 कोटी रुपये दिले होते, मध्यांतरी मात्र, महाविकास आघाडीने एकही निर्णय घेतला नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी खासदार अनंद देशमुख यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube