Narhari Zirwal On SC Result : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले आहे.
Maharashtra Political Crises : …तर उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान केलं असतं
सर्वोच्च न्यालायाच्या या निकालावर आता विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, ‘मी निकालाची प्रक्रिया ऐकलेली नाही. कोर्टाने सांगितलं की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर ते परत येऊ शकले असते. पण कोर्टाने राज्यपालांच्या भुमिकेवर ताशेरे ओढले आहेत. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा कायम आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे. आमदार अपात्र झाले तर त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरतील. त्यामुळे हे सरकार अजूनही टांगणीवर आहे. अशी प्रतिक्रिया झिरवळांनी दिली आहे.
दरम्यान हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठविण्याचे जाहीर केले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी पार पडली होती. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज (दि.11 मे) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्या. कृष्णा कुमारी, न्या. हेमा कोहली आणि न्या. पी.एस. नरसिम्हा यांच्या घटनापीठाने राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणावर निकाल दिला.
एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होणार का, शिंदे सरकार राहणार की जाणार, मुख्यमंत्री बदलणार का, अशा महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे अजून तरी मिळालेली नाहीत.