Maharashtra Political Crisis : न्यायालायाच्या निकालावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया…

Maharashtra Political Crisis : न्यायालायाच्या निकालावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया…

Rahul Narvekar On SC Result : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला. अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय अध्यक्षांनी लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले आहे.

सर्वोच्च न्यालायाच्या या निकालावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, ‘निकाल ऐकला पण त्याचं संपूर्ण अभ्यास करण आवश्याक आहे. कारण त्यात अनेक मुद्दे आहेत. कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, अपात्रतेविषयीचा निर्णय आणि विधीमंडळातील पक्ष यांच्या अधिकारांवर कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्याचा विचार करावा लागेल.

कोर्टाने असं नमुद केलं आहे की, अध्यक्षांनी याचा निर्णय घ्यावा. त्यामुळे आता अपात्रतेचा निर्णय तसेच पक्षाच्या व्हिपवर विधानसभा अध्यक्षच घेऊ शकतील तशी संविधानात तरतुद आहे. अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे.

Maharashtra Political Crisis : शिंदेंचे सरकार वाचले! ना अजितदादांची गरज ना ‘प्लॅन बी’ची आवश्यकता

दरम्यान हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठविण्याचे जाहीर केले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी पार पडली होती. त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज (दि.11 मे) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्या. कृष्णा कुमारी, न्या. हेमा कोहली आणि न्या. पी.एस. नरसिम्हा यांच्या घटनापीठाने राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणावर निकाल दिला.

एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होणार का, शिंदे सरकार राहणार की जाणार, मुख्यमंत्री बदलणार का, अशा महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे अजून तरी मिळालेली नाहीत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube