Nashik Lok Sabha Constituency Mahauti Dispute : राज्यात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असा लोकसभेचा (Lok Sabha 2024) जंगी सामना होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच जागा वाटपावरून दोघांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यातून एकमेंकांना थेट आव्हाने दिले जाऊ लागले आहेत. महायुतीमध्ये मात्र नाशिक लोकसभा मतदारसंघावरून (Nashik Lok Sabha) जोरदार रस्सीखेच सुरू आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेतेही आक्रमक झालेले आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते व आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनाच जोरदारपणे टोमणा मारलाय.
Loksabha Election: ज्योती मेटे या पंकजा मुंडेंचे गणित बिघडविणार?
नाशिकला शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. शिवसेनेची एक यादी जाहीर झाली. त्यात सात खासदारांना उमेदवारी मिळाली. पण गोडसे यांचे नाव त्यात नव्हते. त्यामुळे गोडसे हे थेट मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. या जागेवरून त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांना येथून रिंगणात उतरण्यासाठी भाजपच आग्रहही आहे. त्यांना उमेदवार करण्याची थेट दिल्लीवरून आदेश आला आहे. त्यावरून शिंदे गट हा नाराज आहे. आता या जागेबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी एक विधान केले आहे. नाशिकमध्ये भाजपचे तीन खासदार आहेत. ७० नगरसेवक आहेत. हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे. या जागेबाबत एक-दोन दिवसांत अंतिम होईल, असे महाजन यांनी म्हटले आहे.
‘निवडणुकीत PM मोदींकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न’; राहुल गांधींचा गंभीर आरोप
त्यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी गिरीश महाजन यांना जोरदार सुनावले आहे. गिरीश महाजन हे संकटमोचक आहे. पण पुन्हा चिंधी बांधून लंका जाळण्याचा भानगडीत पडू नका. त्यासाठी प्रयत्न करू नका. सध्या रामराज्य चांगले आहे. महायुती कायमस्वरूपी टिकेल, याकडे लक्ष द्या, असा टोलाही शिरसाटांनी लगावला आहे.
दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी नाशिकसाठी माझा नावाचा दिल्लीत विचार होत आहे, असा सांगून जागा वाटपाच्या वादात ठिणगी टाकली होती. त्यावर संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ही जागा शिवसेनेची आहे. दोन वेळेस खासदार मोठा मताधिक्याने निवडून आलेला आहे. ही जागा दुसऱ्याला देणे म्हणजे शिवसेनेचे अस्तित्व संपविण्यासारखे असल्याचे शिरसाट यांनी म्हटले आहे.