Navneet Rana News : हरियाणासारखंच महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला वनसाईड बहुमत मिळणार असल्याचा फुल कॉन्फिडन्स माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी व्यक्त केलायं. दरम्यान, जम्मू काश्मीर (Jammu kashmir Election) आणि हरियाणात विधानसभा (Haryana Election) निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचे आज निकाल जाहीर झाले आहेत. जम्मू काश्मीरात नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता तर हरियाणात भाजपचे आपली सत्ता काय राखलीयं. या निकालांवर बोलताना राणा यांनी महाराष्ट्रातही हेच चित्र राहणार असल्याची भूमिका मांडलीयं.
गणपतराव देशमुखांचा बायोपिक रुपेरी पडद्यावर, ‘कर्मयोगी आबासाहेब’चा टीजर प्रदर्शित
नवनीत राणा म्हणाल्या, आज हरियाणाचा निकाल जो लागलायं आहे. या निकालामध्ये भाजपने बहुमताने लीड घेतला आहे. अनेक लोकं म्हणत होते की भाजपला एवढ्या तेवढ्या जागा मिळतील, असा दावा करीत होते बरेच अजेंडे सांगत होते. भाजपला विरोध आहे, असंही विरोधक सांगत होते, पण जो काम करेल त्याच्या पाठीशी हरियाणाची जनता राहणार असल्याचं जनतेने दाखवून दिलंय. हरयाणासारखीच महाराष्ट्राची जनताही वनसाईड बहुमत भाजप महायुतीला देणार असल्याचं नवनीत राणा यांनी स्पष्ट केलंय.
हरियाणात आप साफ! केजरीवाल-सिसोदियांच्या प्रचाराचा परिणाम शून्य, सर्वत्र पिछाडी
हरियाणाचा विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या विकासकामांमुळेच झाला आहे. हरियाणाच्या जनतेला माहिती आहे, की विकासकामे करणारं सरकार कोणतं आहे, त्यामुळेच हरयाणाच्या जनतेने विकास करणाऱ्याच सरकारला निवडून दिलंय. हरियाणाच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्री अमित शाहा यांचं अभिनंदन नवनीत राणा यांनी यावेळी केलंय.
‘देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता..,’; फडणवीसांचा डायलॉगबाजीतून इशारा
हरियाणामध्ये भाजपला 49 जागांवर विजय मिळाला आहे तर दुसरीकडे काँग्रेसला 36 जागांवर विजय मिळाला आहे. हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजपने सत्ता कायम राखली असून पुन्हा एकदा भाजप हरियाणामध्ये सरकार स्थापन होणार आहे. तर दुसरीकडे भाजप हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा होत असून मुख्यमंत्री नायब सिंग सैनी हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत. तर सैनी यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले पाच मंत्री पराभूत झाले आहेत.