हरियाणात आप साफ! केजरीवाल-सिसोदियांच्या प्रचाराचा परिणाम शून्य, सर्वत्र पिछाडी

हरियाणात आप साफ! केजरीवाल-सिसोदियांच्या प्रचाराचा परिणाम शून्य, सर्वत्र पिछाडी

Haryana Assembly Election Results : हरियाणात अरविंद केजरीवालांची जादू चाललीच नाही. आम आदमी पार्टीने येथे भरपूर प्रयत्न केले. 88 जागांवर उमेदवार दिले. मात्र मतमोजणीत आप हरियणातून साफ होताना दिसत आहे. आम आदमी पार्टी एकाही मतदारसंघात आघाडीवर नाही. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांनी निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. मात्र हरियाणातील मतदारांवर त्याच काहीच परिणाम झाला नाही. सध्याच्या ताज्या माहितीनुसार अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष एकाही मतदारसंघात आघाडीवर नाही.

हरियाणात पिक्चर अभी बाकी है! सुरुवातीच्या पि‍छेहाटीनंतर भाजपाची जोरदार मुसंडी; काँग्रेसला धक्का

हरियाणातील ९० जागांवर मतदान संपल्यानंतर राज्यात नवीन सरकार कोणाचं येणार हे समजण्यासाठी आता उलटी गिनती सुरू झाली आहे. बहुतांश एक्झिट पोलने काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. हरियाणात दहा वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत मिळाल्याने काँग्रेसमध्ये उत्साह असतानाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीबाबतही चुरस सुरू झाली आहे.

पक्षाचे उमेदवार डिपॉझिट तरी वाचवतील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मतमोजणीच्या आधीच्या एक्झिट पोलमध्ये सुद्धा आम आदमी पार्टीला झटका बसला होता. हरियाणात पक्षाला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. जर हा ट्रेंड असाच कायम राहून निकालात परावर्तित झाला तर अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा धक्का ठरणार आहे. थोड्याच दिवसांत दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशात आता दिल्लीसाठीही धोक्याची घंटा हरिणान वाजविली आहे असे म्हणता येईल.

विनेश फोगाटला जोरदार दणका

कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्तीचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेसने जुलाना मतदारसंघातून विनेशला तिकीट दिलं होतं. तर भाजपने कॅप्टन योगेश बैरागींना मैदानात उतरवलं होतं. सुरुवातीच्या टप्प्यात विनेशला मोठी आघाडी मिळाली होती. परंतु, आताच हाती आलेल्या माहितीनुसार विनेश फोगाटला जोरदार दणका बसला आहे. विनेश फोगाट दोन हजारांपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर पडली आहे.

Haryana Election 2024 : हरियाणात पुन्हा भाजप? जाणून घ्या सट्टा बाजार अंदाज

पिछेहाटीनंतर भाजपाची जोरदार मुसंडी

हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Haryana Assembly Elections) सुरू आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर (Congress Party) होती. परंतु, थोड्याच वेळात येथील चित्र पूर्ण बदलले आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली आहे. सध्याच्या कलांनुसार भाजप हरियाणात जवळपास 48 जागांवर (Haryana Elections  2024) आघाडीवर असून काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube