हरियाणात पिक्चर अभी बाकी है! सुरुवातीच्या पि‍छेहाटीनंतर भाजपाची जोरदार मुसंडी; काँग्रेसला धक्का

हरियाणात पिक्चर अभी बाकी है! सुरुवातीच्या पि‍छेहाटीनंतर भाजपाची जोरदार मुसंडी; काँग्रेसला धक्का

Haryana Assembly Election Results : हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Haryana Assembly Elections) सुरू आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर (Congress Party) होती. परंतु, थोड्याच वेळात येथील चित्र पूर्ण बदलले आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली आहे. सध्याच्या कलांनुसार भाजप हरियाणात जवळपास 51 जागांवर (Haryana Elections  2024) आघाडीवर असून काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहे.

हरियानातील ९० जागांवर मतदान संपल्यानंतर राज्यात नवीन सरकार कोणाचं येणार हे समजण्यासाठी आता उलटी गिनती सुरू झाली आहे. बहुतांश एक्झिट पोलने काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. हरियाणात दहा वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत मिळाल्याने काँग्रेसमध्ये उत्साह असतानाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीबाबतही चुरस सुरू झाली आहे.

Haryana Vidhansabha : कॉंग्रेसच्या डीएनएमध्येच आरक्षण विरोध..PM मोदींचे जोरदार टीकास्त्र

हरियाणात 67.9 टक्के मतदान झालं होतं. राज्यात 5 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झालं होतं. त्यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या टप्प्यातील मतमोजणीत काँग्रेसला जबरदस्त आघाडी मिळाली. बहुमतही मिळताना दिसत होतं. नंतर मात्र ही आघाडी कमी होत गेली. काँग्रेस बहुमतापासून प्रचंड दूर गेली. सध्याच्या परिस्थितीत भाजप 51 जागांवर तर काँग्रेस 34 जागांवर आघाडीवर आहे.

विनेश फोगाटला जोरदार दणका

कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्तीचा राजीनामा देत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेसने जुलाना मतदारसंघातून विनेशला तिकीट दिलं होतं. तर भाजपने कॅप्टन योगेश बैरागींना मैदानात उतरवलं होतं. सुरुवातीच्या टप्प्यात विनेशला मोठी आघाडी मिळाली होती. परंतु, आताच हाती आलेल्या माहितीनुसार विनेश फोगाटला जोरदार दणका बसला आहे. विनेश फोगाट दोन हजारांपेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर पडली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube