हिशोब होणारच, माफी नाही; लोकसभेच्या पराभवाची सल कायम, नवनीत राणांकडून बच्चू कडू टार्गेटवर
Navneet Rana vs Bachu Kadu : अमरावतीच्या राजकारणात आमदार बच्चू कडू आणि नवनीत राणा व रवी राणा यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. कडू व राणा यांच्यातील वाद आणि एकमेकांवरील टीका सतत पाहायला मिळत असते. (Bachu Kadu) यातच लोकसभा निवडणुकीत भाजपकडून लढलेल्या नवनीत राणा यांचा पराभव झाला. यासाठी राणा बच्चू कडू यांना जबाबदार धरतात. कारण महायुतीत असतानाही कडू यांनी त्यांच्या पक्षाचा उमेदवार दिला होता.
Shivaji Maharaj Statue: मोठी बातमी! शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे फरार
आता अमरावतीतील परतवाडातील दहीहिंडी कार्यक्रमात आपल्या पराभवाबद्दल संताप व्यक्त करत नवनीत राणांनी बच्चू कडूंवर जोरदार टीका करत हिशोब होणारच असं वक्तव्य केलं आहे. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर मी पहिल्यांदा आले आहे. काही सुपारी बहाद्दरांनी सुपारी घेतली होती पाडण्याची. इथं आपले काही भाऊ आहेत, जे कोणालातरी पाडण्याची सुपारी घेतात. माहीत आहे ना कोण आहे? सगळ्यांना माहित आहे.
हे शहर आता खूप कडू झाले आहे. माझ्या पराभवामुळे जिल्हा दहा वर्षे मागे पडला आहे. या अचलपूरमध्ये गेल्या 20 वर्षात एकाही नवा उद्योग आला नाही. इथले प्रतिनिधी मंत्री होते तेव्हा सुद्धा एमआयडीसीत एक कंपनी आणता आली नाही. इथे उभारलेल्या युवकांना नोकरी नाही. आता तुम्ही या सगळ्याचा हिशोब कारयचा आहे. आता माफी नाही असं विधान राणा यांनी केलं.
राज्यभर दही हंडी उत्सवाचा थर थरार! मुंबईत 129 गोविंदा जखमी; दोघं गंभीर, KEM रुग्णालयात उपचार
अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. येथून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे विजयी झाले आहेत. निकराच्या लढतीत त्यांनी नवनीत राणा यांचा १९७३१ मतांनी पराभव केला याआधी 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी येथून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला होता. यावेळी त्या पुन्हा अमरावतीतून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत होत्या.