राज्यभर दही हंडी उत्सवाचा ‘थर’थरार! मुंबईत 129 गोविंदा जखमी; दोघं गंभीर, ‘KEM’ रुग्णालयात उपचार
Govinda injured in Dahi Handi festival : काल राज्यभरात उत्सवात दहीहंडी थरांचे थरार पाहायला मिळाले. यामध्ये प्रामुख्याने मुंबईत अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. (Dahi Handi) मुंबईत दरवर्षीच मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. उंचावर बांधलेल्या दहीहंडी मोठमोठे मानवी मनोरे रचून फोडल्या जातात. मात्र, यामध्ये अनेक गोविंदा जखमी झाल्याचंही वृत्त आहे.
Gautami Patil: गौतमीच्या कातिला अदावर, मुंबईकर फिदा; प्रकाश सुर्वेंची दहीहंडी गाजवली, पाहा फोटो
दहीहंडी उत्सवाचा भाग म्हणून मानवी पिरॅमिड बनवणारे 65 गोविंदा जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या वतीनं याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या जखमी गोविंदांना कॉर्पोरेशन संचालित आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामध्ये दोघंजण गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा सण मुंबईसह राज्याच्या इतर भागात पारंपारिक उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. तरुणांसोबतच प्रत्येक वयोगटातील लोकही यात उत्साहानं सहभागी होत असतात.