Download App

‘अब तेरा क्या होगा दाढीया… अंधारेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Maharashtra Political Crisis Update: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis government) पाठिंबा दिल्याने पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी, अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर रामराम ठोकला आहे.अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहिला मिळाला आहे. यावर ठाकरे गटाच्या (Thackeray Group) फायरब्रॅंड नेत्या म्हणून ओळख असलेल्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे.

Maharashtra Politics : ‘आता फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या’.. पटोलेंचा भाजपवर घणाघात

तसेच अब तेरा क्या होगा दाढीया…???, तसेच काल…आज…उद्या… विश्वासासाह्रतेच दुसरं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे… अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे (Sushma andhare ) यांनी प्रतिक्रिया दिली असून फडणवीस साहेबांच उत्तम नियोजन आणि शिंदे साहेबांचा विकास पाहून अजितदादा या सरकारच्या प्रेमात पडले होते. सत्तेपेक्षा विकास कसा करावा हे अजित दादांच्या लक्षात आलं अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांच्या शपथविधीवर सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाण साधला आहे. कालपर्यंत खोके म्हणणारे लोक आज ओके होऊन सरकारमध्ये आले त्यांच आम्ही स्वागत अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी यावेळी दिली आहे.

दिल्लीत रचला प्लॅन अन् राज्यात घडला भूकंप; अजितदादांच्या बंडामागे नेमकं काय घडलं?

अजित पवारांच्या बंडानंतर आता राष्ट्रवादीत मोठा बदल झाल्याचे दिसत आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांची विरोधी पक्षनेतेपदी आणि प्रतोपदी नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर लगेच आव्हाडांनी पत्रकार परिषदे घेत बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषदे बोलतांना सांगितलं की, बंडखोर आमदारांनी असचं काही करायची गरज नव्हती. 6 तारखेला बैठक होती, आणि त्याआधीच त्यांनी बंड केलं. 25-25 वर्ष या लोकांनी मंत्रीपंद भोगली. आणखी काय द्यावं शरद पवारांनी यांना? त्यांचं सिल्वर ओक घरही द्यावं का? असा सवाल करत आव्हाड चांगलचे संतापले.

तसेच ज्यांनी तुम्हाला मंत्रीपदं दिली. कुणाला महसुल मंत्री केलं. कुणाला अर्थमंत्री केलं. शरद पवारांकडे तुम्हाला पदांसाठी जावंही लागलं नाही. तर त्यांनीच फोन करून तुम्हाला मंत्रीपदं देऊ केली आणि अशा बाप माणसाला त्याच्या उतारत्या वयात हे दिवस दाखवणं, त्या बापाला अशा परिस्थितीत आणणं हे माणूसकीला शोभणारं नाही. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात एक दु:खाची छटा असेल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

Tags

follow us