दिल्लीत रचला प्लॅन अन् राज्यात घडला भूकंप; अजितदादांच्या बंडामागे नेमकं काय घडलं?

दिल्लीत रचला प्लॅन अन् राज्यात घडला भूकंप; अजितदादांच्या बंडामागे नेमकं काय घडलं?

Maharashtra NCP Political Crisis : अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह आणखीही काही आमदारांनी शपथ घेतली. या बंडानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या सगळ्या अनपेक्षित घडामोडी अखेर घडल्या कशा, कुणालाा काहीच कसं समजलं नाही, राज्याच्या राजकारणात हा भूकंप घडला तरी कसा अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

याबाबत आता काही महत्वाची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यात चर्चा सुरू होत्या. त्यानंतर हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांच्यासारखेही काही नेते पुढे आले.

‘मी साहेबांबरोबर…’, अजित पवारांच्या शपथविधीवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया…

इकडे अशी तयारी सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली. अजित पवार यांच्या गटाला कसं सोबत घ्यायचं यावर मंथन करण्यात आले. यानंतर अजित पवार यांच्यासोबत जे आहेत त्यांनीही प्रत्येकाने दोन ते तीन आमदार सोबत आणू असा शब्द दिला.

यानंतर आमदारांची जुळवाजुळव करण्यात आली. ज्यावेळी आमदारांचा आकडा 30 च्या पुढे गेला त्यानंतर अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाबरोबर चर्चा सुरू केली. इतकेच नाही तर आता असेही समोर येत आहे की मागील जून महिन्यात अजितदादांनी कुणालाही कळू न देता अमित शाह यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती.

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांचं प्रमोशन, विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती

सगळे जुळत असल्याचे लक्षात येताच अन्य नेत्यांनीही चर्चेला सुरुवात केली. 22 जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थानी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी भेट घेतली. या बैठकीत जवळपास दोन तास उभयतांत चर्चा झाली.

सगळे डावपेच योग्य पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा दिल्ली गाठली. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केली. त्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार, शपथविधी या मुद्द्यांवर ठोस निर्णय घेण्यात आला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube