मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांचं प्रमोशन, विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांचं प्रमोशन, विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती

Maharashtra Politics : अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकवत थेट उपमुख्यमंत्रीपदाची शपथच घेतली. त्यांच्याबरोबर आणखीही काही आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या अनपेक्षित झालेल्या राजकीय भुकंपाने राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता आणखी मोठी बातमी समोर आली आहे.

प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर कारवाई करणार; शरद पवारांचा इशारा

या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत या घडामोडींवर भाष्य केले. त्यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांची राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. याबरोबरच त्यांची पक्षाच्या प्रतोदपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयांची माहिती स्वतः आव्हाड यांनीच पत्रकार परिषदेत दिली.

उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी निवडणुकी या राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पक्ष चिन्हावर लढणार असल्याचे सांगितले. एक प्रकारे त्यांनी पक्षावरच दावा ठोकला. यानंतर आव्हाड यांना राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाकडे असेल असा प्रश्न विचारण्यात आला. आव्हाड म्हणाले, आताच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्याकडेच आहे. जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत. जयंत पाटील यांनीच माझी विरोधी पक्षनेता आणि पक्ष प्रतोदपदी नियुक्ती केली. त्यामुळे आता मी जो व्हीप देईल तो राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना पाळावाच लागेल, असे आव्हाड म्हणाले.

अजित पवारांच्या बंडाला शरद पवारांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेलांचा पाठिंबा

अजितदादांचा पक्षावर दावा, शरद पवार म्हणाले… 

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार असे त्यांनी सांगितले होते. यावर शरद पवार म्हणाले की माझे काही म्हणणे नाही. कोणी काही दावा करा. माझा लोकांवर विश्वास आहे. मी लोकांमध्ये जाईल आणि हा निर्णय लोक ठरवतील.

राष्ट्रवादी हा पक्ष नव्हता पण आमच्यातील काही सहकाऱ्यांना भूमिका पटली नाही म्हणून पक्ष स्थापन केला. पहिला पक्ष दुसऱ्यांनी नेला असेल पण त्यांच्या परिणाम आमच्यावर होणार नाही. त्यामुळे कोणी काही केलं तरी आम्ही लोकांमध्ये जाऊन आमची भूमिका मांडू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube